शेळी दूध व दुग्धजन्य प्रक्रिया उद्योग हा आशिया खंडातील पहिला प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 18:54 IST2019-06-04T18:53:31+5:302019-06-04T18:54:54+5:30
सिन्नर : शेळी दूध व दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योग हा महिलांनी सुरू केलेला देशातील नव्हे तर आशिया खंडातील पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी सर्वतोपरी सहकार्य व मार्गदर्शन विद्यापीठाच्या माध्यमातून केले जाईल, त्याबाबतचा सामंजस्य करार युवा मित्र संस्था व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्यामध्ये करण्यात आला असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू के. पी. विश्वनाथा यांनी केले.

शेळी दूध व दुग्धजन्य प्रक्रिया उद्योग हा आशिया खंडातील पहिला प्रकल्प
सिन्नर येथील बेलांवे शिवार येथे शनिवारी युवा मित्र संस्था सिन्नर, सावित्रीबाई फुले प्रोड्यूसर कंपनी लि., एच. टी. पारेख फाउंडेशन मुंबई व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने शेळीचे दूध व दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन समारंभ व महिला मेळावा कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. माजी मंत्री विनायकदादा पाटील, आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, पशुसंवर्धन विभाग सहाय्यक आयुक्त डॉ. सुधाकर शिरसाठ, उपायुक्त डॉ. संजय विसावे, पशुधन विकास अधिकारी डॉ. मिलींद भणगे, मविप्रचे संचालक हेमंत वाजे, एच. टी. पारेख स्विटी थॉमस, नाबार्डचे अतुल वेदपाठक, वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णा भगत, ज्येष्ठ उद्योजक पुंजाभाऊ सांगळे, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, नामदेव शिंदे, रामनाथ पावसे, नगरसेवक विजय जाधव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमास तालुक्यातील १५०० महिलांनी सहभाग नोंदविला. सावित्रीबाई फुले शेळीउत्पादक कंपनीने सुरू केलेल्या भारतातील पहिला शेळी दूध व दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योगाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. युवा मित्र संस्थेच्या संचालक मनीषा पोटे यांनी प्रास्तविक केले.