शिवभोजन थाळी लाभार्थी वाढविण्याचे लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 01:47 AM2020-02-19T01:47:49+5:302020-02-19T01:49:25+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील शिवभोजन थाळीला नाशिक जिल्ह्णात मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता जिल्हा प्रशासनाने यामध्ये अधिक वाढ करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. सद्यस्थितीत ठाणे जिल्ह्णानंतर नाशिकचा क्रमांक असल्याने आता अव्वल येण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न केले जाणार आहेत.

The goal of raising the beneficiaries of the Shiv Bhoja plate | शिवभोजन थाळी लाभार्थी वाढविण्याचे लक्ष्य

शिवभोजन थाळी लाभार्थी वाढविण्याचे लक्ष्य

Next
ठळक मुद्देप्रशासनाची तयारी : अग्रक्रमासाठी प्रयत्न

नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील शिवभोजन थाळीला नाशिक जिल्ह्णात मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता जिल्हा प्रशासनाने यामध्ये अधिक वाढ करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. सद्यस्थितीत ठाणे जिल्ह्णानंतर नाशिकचा क्रमांक असल्याने आता अव्वल येण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न केले जाणार आहेत.
राज्यात शिवभोजन थाळीला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर या योजनेचा विस्तार करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्यामुळे नाशिकमध्येदेखील थाळींच्या संख्येत वाढ होणार आहे. शहरात चार आणि मालेगाव येथे एक याप्रमाणे चार केंद्रे नाशिकमध्ये सुरू आहेत. प्रत्येकी दररोज १५० थाळींची मर्यादा असल्यामुळे या थाळी निर्धारित वेळेत संपत असल्याने जिल्ह्णातील प्रतिसाद लक्षणीय असल्याची बाब समोर आली आहे. राज्यात ठाणे जिल्ह्णात सर्वाधिक थाळींची विक्री झाली, तर त्या खालोखाल नाशिक जिल्ह्णातील थाळींची संख्या आहे.
शिवभोजन योजनेला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने या योजनेचा विस्तार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार आता या योजनेतील थाळीच्या इष्टाकांत (संख्येत) दुप्पट वाढ करण्यात आली असल्याने नाशिक जिल्ह्णातील ६०० थाळींची संख्या वाढून ८०० होणार आहे. याबरोबरच आणखी काही ठिकाणी शिवभोजन थाळीचे केंद्र सुरू होणार असल्यामुळे जिल्ह्णातील शिवभोजनचे लाभार्थी वाढण्यास मदत होणार आहे. या योजनेकडे जास्तीत जास्त लाभार्थींना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून, यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे स्वत: लक्ष घालणार आहेत. त्यांनी तशा सूचनादेखील दिल्या आहेत.
आता योजनेचा आणखी विस्तार करण्यात येणार आहे. शहरात अनेक संस्था इच्छुक असल्याने त्यांनी संपर्कही केला आहे.
अधिकारी देणार भेटी
अन्न, नागरी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांव्यतिरिक्त तहसीलदार, गट विकास अधिकारी तथा समकक्ष अधिकाºयांमार्फत शिवभोजन केंद्राची भेट व तपासणी आयोजित करण्याच्या सूचनाही यात देण्यात आल्या आहेत. या भेटीदरम्यान त्यांनी शिवभोजन केंद्रावरील स्वच्छता, नीटनेटकेपणा, अन्नाची गुणवत्ता या बाबींकडे लक्ष द्यावे अशा सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत.

Web Title: The goal of raising the beneficiaries of the Shiv Bhoja plate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.