वैद्यकिय विभागातील भरतीसाठी पुन्हा शासनाला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 10:49 PM2020-09-28T22:49:31+5:302020-09-29T01:17:27+5:30

नाशिक : कोरोना बाधीतांची संख्या वाढत असून त्यासाठी महापालिकडेकडून पुरेसे कोविड सेंटर्स तयार करण्याची तयारी सुरू असली तरी मुळातच महापालिकेकडे अपुरा वैद्यकिय कमर्चारी तसेच तात्पुरत्या भरतील प्रतिसाद मिळत नसल्याने अखेरीस शासनाने रिक्तपदे १३६ रिक्तपदे कायम स्वरूपी भरण्यासाठी आयुक्त कैलास जाधव यांनी पत्र व्यवहार केला आहे.

Go back to the government for recruitment in the medical department | वैद्यकिय विभागातील भरतीसाठी पुन्हा शासनाला साकडे

वैद्यकिय विभागातील भरतीसाठी पुन्हा शासनाला साकडे

Next
ठळक मुद्देआयुक्तांचे पत्र: कोरोनाशी दोन हात करताना प्रशासनाची दमछाक 

नाशिक : कोरोना बाधीतांची संख्या वाढत असून त्यासाठी महापालिकडेकडून पुरेसे कोविड सेंटर्स तयार करण्याची तयारी सुरू असली तरी मुळातच महापालिकेकडे अपुरा वैद्यकिय कमर्चारी तसेच तात्पुरत्या भरतील प्रतिसाद मिळत नसल्याने अखेरीस शासनाने रिक्तपदे १३६ रिक्तपदे कायम स्वरूपी भरण्यासाठी आयुक्त कैलास जाधव यांनी पत्र व्यवहार केला आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून महापालिकेचा आकृती बंध मंजुरीसाठी प्रलंबीत असला तरी आता तातडीची बाब म्हणून ही रिक्तपदे भरण्याची मागणी आयुक्तांनी केली आहे. कोरोनशी लढताना शासन महापालिकेच्या पाठीशी असल्याचे सांगितले जाते आता खरोखरीच याबाबत प्रशासन काय निर्णय घेते याकडे पालिका वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
डॉ. प्रविण गेडाम यांनी आयुक्तपदाच्या काळात शासनाकडे नवा आकृतीबंध मंजुरीसाठी पाठविला आहे. मात्र,तो मंजुर करण्याबाबत शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली नाहीत महापािलकेचा आस्थापना खर्च ३५ टक्क्यांपेक्षा
अधिक असल्याचे सांगून टाळाटाळ केली जात आहे. सदद्या कोरोनामुळे महापलिकेची अवस्था बिकट झाली आहे. आधीच रिक्तपदे त्यात कोरोनामुळे वाढलेला ताण अशा स्थितीत काम करणे यंत्रणेला कठीण होत आहे. कोरोना
संकटामुळे शासनाने सहा महिन्याच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात मानधनावर ८४९ पदे भरण्यासाठी परवानगी दिली. त्यानुसारा थेट मुलाखती घेतल्या होत्या.परंतु ही पदे स्थायी स्वरूपात नव्हे तर मानधनावर असल्यामुळे त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही महापािलकेला आवश्यक असलेल्या फिजीशियन,भूलतज्ञ,बालरोग तज्ञ,अस्थिरोग तत्ज्ञ, महिलारोग तज्ञासह अनेक तज्ज्ञांची पदे रिक्त आहेत. डॉक्टरांची ५७ पदे तर स्टाफ नर्स, मिश्रक, वॉर्डबॉय, आया, एएनएम, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशा विविध संवगार्तील १३६ पदे रिक्त आहेत.
महापालिकेच्या आस्थापनेवर १०३ डॉक्?टरांची पदे मंजूर असली तरी सद्यस्थितीत ५७ पदे रिक्त आहेत. याशिवाय स्टाफ नर्स ७५, ए.एन.एम. १०, मिश्रक ३, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ४, वॉर्डबॉय २७, आया २४ अशी एकुण १३६ पदे रिक्त आहेत. शहरात महापालिकेचे पाच मोठे रुग्णालय व ३० शहरी आरोग्य केंद्रे आहेत याशिवाय चार नवीन प्रसृती गृहे तयार करण्यात आली आहे.
मात्र, ते पूर्ण क्षमेतेने कार्यान्वीत करण्यास मनुष्यबळ अपुरे पडत्त आहे. त्यामुळे करोना काळात रिक्त असलेली पदे भरण्यास परवानगी मिळावी यासाठी आयुक्त कैलास जाधव यांनी आरोग्य मंत्री आणि मुख्य सचिवांना पत्र लिहले आहे.

सध्या कोरोनामुळे वैदद्यकिय कमर्चाऱ्यांची गरज आहे. रिक्तपदांवर कायमस्वरूपी भरतीला परवानगी मिळाली तर महापालिकेला तज्ञ डॉक्टर व वैद्यकिय कमर्चारी उपलब्ध होऊ शकतात.त्यामुळे वैद्यकीय विभागाच्या
आस्थापनेवरील रिक्त पदे भरण्यास परवानगी शासनाला प्रस्ताव पाठविला आहे.
- कैलास जाधव, आयुक्त, मनपा.

 

Web Title: Go back to the government for recruitment in the medical department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.