मुल्हेरच्या सोनवणेंचा पंतप्रधानांच्या हस्ते गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 18:41 IST2018-08-13T18:41:20+5:302018-08-13T18:41:36+5:30

‘एक्सलन्स इन पी.एच.डी रिसर्च’ या पुरस्काराने सन्मानित

 Glory at the hands of the Prime Minister of Mulher | मुल्हेरच्या सोनवणेंचा पंतप्रधानांच्या हस्ते गौरव

मुल्हेरच्या सोनवणेंचा पंतप्रधानांच्या हस्ते गौरव

ठळक मुद्देडॉ.सोनवणे यांनी सूक्ष्मजीवशास्त्र ,अभियांत्रिकी व रसायन शास्त्रात डॉक्टरेट मिळविली आहे

सटाणा : तालुक्यातील मुल्हेर येथील रहिवाशी डॉ.जयेश सोनवणे यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘एक्सलन्स इन पी.एच.डी रिसर्च’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
मुंबई येथील आयआयटी पवई या संस्थेच्या हीरक महोत्सव सोहळ्यात डॉ.सोनवणे यांना गौरविण्यात आले. डॉ.सोनवणे यांनी सूक्ष्मजीवशास्त्र ,अभियांत्रिकी व रसायन शास्त्रात डॉक्टरेट मिळविली आहे. या अभ्यासक्र मादरम्यान संशोधन क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. पुढील महिन्यापासून टोरांटो विद्यापीठात संशोधक म्हणून ते पदभार सांभाळणार आहेत. मुल्हेर येथील व्यापारी मनोहर चिंतामण सोनवणे यांचे ते चिरंजीव आहेत.

Web Title:  Glory at the hands of the Prime Minister of Mulher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.