अग्निशमन विभागाचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:13 IST2020-02-25T22:39:51+5:302020-02-26T00:13:46+5:30
देवळा तालुक्यातील मेशी येथे एसटी बस विहिरीत पडून झालेल्या अपघातात जखमी व मयत यांना बाहेर काढण्यासाठी जिवाची पर्वा न करता मदत करणारे मालेगाव अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी संजय पवार व कर्मचारी यांना जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. आरती सिंह यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

मालेगाव अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी संजय पवार यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करताना जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. आरती सिंह.
मालेगाव : देवळा तालुक्यातील मेशी येथे एसटी बस विहिरीत पडून झालेल्या अपघातात जखमी व मयत यांना बाहेर काढण्यासाठी जिवाची पर्वा न करता मदत करणारे मालेगाव अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी संजय पवार व कर्मचारी यांना जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. आरती सिंह यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
नाशिक येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे, शाखा प्रभारी अधिकारी यांची मासिक गुन्हे आढावा बैठक घेण्यात आली. यात सर्व पोलीस ठाण्यांचा गुन्ह्याचा आढावा घेण्यात आला. प्रभारी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांना गडचिरोली जिल्ह्यात खडतर सेवा केल्याबद्दल मिळालेले पदक देऊन त्यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक ग्रामीणच्या श्रीमती वालावलकर यांच्यासह विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते.