जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 00:43 IST2019-04-16T00:43:00+5:302019-04-16T00:43:34+5:30

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने अशोकनगर येथे जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

 Gizau Brigade Greetings to Babasaheb | जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन

जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन

नाशिक : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने अशोकनगर येथे जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
याावेळी प्रमुख अतिथी मीनाक्षी पवार यांनी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा दिला, तर कार्यक्र माच्या अध्यक्ष शिवमती नलिनीताई कड यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्त्या रेखाताई कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.
ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्ष वैशाली डुंबरे यांनी हिंदू कोड बिल आणि स्त्रियांना न्याय व समता मिळवून देण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी केलेल्या तरतुदींची माहिती दिली. जिल्हा अध्यक्ष कुमुदिनी भामरे यांनी प्रास्ताविक केले, तर महानगरप्रमुख चारु शीला देशमुख यांनी आभार मानले.
मनीषा पाटील यांनी संविधानाची उदेशिकेचे वाचन केले. याप्रसंगी वैशाली देवरे, रोहिणी सोनावणे, दीपाली डुंबरे, विद्या पवार, जोत्स्ना जाधव, मानसी डांगल, सूचिता कुहे, अनुसया ढुमणे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Web Title:  Gizau Brigade Greetings to Babasaheb