शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

विहिरीत उडी घेतलेल्या शेतमजुराला जीवनदान; अग्निशमन दलाचे रेस्क्यू ऑपरेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 16:08 IST

यावेळी पाण्याचा आवाज झाल्याने शेतीचे मालक त्र्यंबक कोंबडे यांच्यासह अन्य रहिवाशी शेतमजुरांनी विहिरीच्या दिशेने धाव घेतली. कोंबडे यांनी याबाबत इंदिरानगर पोलिसांसह अग्निशमन दलाशी संपर्क करून माहिती दिली.

ठळक मुद्देगौळाणे रोडवरील कोंबडे मळ्यातील घटना

नाशिक : पाण्याने तुडुंब भरलेल्या गौळाणे रोडवरील एका शेतातील विहिरीत ४२ वर्षीय शेतमजुराने सोमवारी (दि.११) दुपारच्या सुमारास अचानकपणे उडी घेतली. ही बाब शेतमालकाच्या लक्षात येतात परिसरातील रहिवाशांनी विहिरीजवळ धाव घेतली. यावेळी अग्निशमन दलाशी संपर्क साधून आपत्कालीन मदत घेण्यात आली. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या सिडको उपकेंद्रावरील जवानांनी घटनास्थळी धाव घेत तासाभराच्या अथक परिश्रमानंतर विहिरीतून त्या शेतमजुराला सुखरूपपणे बाहेर काढले.याबाबत अधिक माहिती अशी, पाथर्डी-गौळाणे रस्त्यावरील यशवंतनगरमधील कोंबडे मळ्यात असलेल्या विहिरीत त्यांच्याच शेतात शेतमजूर म्हणून काम करणाऱ्या सुनील सोना गांगुर्डे (४२) या व्यक्तीने अचानकपणे दुपारच्या सुमारास विहिरीजवळ जात कठड्यावरून विहिरीत उडी घेतली. यावेळी पाण्याचा आवाज झाल्याने शेतीचे मालक त्र्यंबक कोंबडे यांच्यासह अन्य रहिवाशी शेतमजुरांनी विहिरीच्या दिशेने धाव घेतली. यावेळी गांगुर्डे हे पाण्यात पडलेले होते आणि विद्युत पंपाच्या पाइपचा आधार घेत, तरंगत असल्याचे दिसून आले. कोंबडे यांनी याबाबत इंदिरानगर पोलिसांसह अग्निशमन दलाशी संपर्क करून माहिती दिली. माहिती मिळताच सिडको अग्निशमन केंद्रप्रमुख लीडिंग फायरमन देविदास चंद्रमोरे, फायरमन प्रमोद लहामगे, जगदीश देशमुख, सुनील शिलावट, रवी आमले आणि बंबचालक नंदू व्यवहारे यांनी सर्व साधनसामुग्रीसह तत्काळ काही मिनिटांत घटनास्थळ गाठले. विहिरीत पडलेले गांगुर्डे यांना बाहेर काढण्यासाठी जवानांनी सर्वप्रथम विहिरीत ॲल्युमिनियमची मोठी शिडी व दोरखंड सोडला. विहिरीजवळ जमलेले रहिवाशी, तसेच जवानांनी गांगुर्डे यांना शिडीच्या साहाय्याने बाहेर येण्यास वारंवार सांगितले. मात्र, ते पाइप सोडून येण्यास धजावत नव्हते. यामुळे काही जवान विहिरीत उतरले आणि त्यांनी गांगुर्डे यांच्या कमरेला दोरखंड बांधून शिडीवरून सुखरूपपणे बाहेर काढले. तासाभराच्या अथक परिश्रमानंतर जवानांना त्यांना रेस्क्यू करण्यास यश आले.-----

टॅग्स :Nashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलAccidentअपघातPoliceपोलिस