शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

व्यापार उद्योगासाठी पॅकेज द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:14 IST

नाशिक : राज्यातील कोरोना संकटामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापार व उद्योग क्षेत्र मोठ्या प्रमाणात अडचणीत आले असून, व्यापार-उद्योग ...

नाशिक : राज्यातील कोरोना संकटामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापार व उद्योग क्षेत्र मोठ्या प्रमाणात अडचणीत आले असून, व्यापार-उद्योग क्षेत्राची घडी विस्कटू नये यासाठी केंद्र व राज्य शासनाने योग्य असे आर्थिक पॅकेज द्यावे, अशी एकमुखी मागणी शुक्रवारी (दि.१६) महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजने आयोजित केलेल्या बैठकीत घेण्यात आली.

या पॅकेजसाठी राज्य शासनाकडे चेंबर पाठपुरावा करणार असल्याची माहिती चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.

राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’संदर्भात १३ एप्रिल राेजी घेतलेल्या निर्णयानंतर व्यापार व उद्योग क्षेत्रासमोर अधिक निर्बंध असल्याने व्यापार-उद्योग क्षेत्राचे अपरिमित नुकसान होत आहे. तथापि कोरोना नियंत्रणाकरिता सरकारच्या प्रयत्नांमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, लॉकडाऊनच्या या परिस्थितीमध्ये छोटे व्यापारी व व्यावसायिक यांना दुकान भाडे, कर्जावरील व्याज व हप्ते, कामगारांचे पगार, घरपट्टी, वीज बिल आदी खर्चामुळे आर्थिक अरिष्टाला सामोरे जावे लागत आहे. व्यापारी व व्यावसायिकांमध्ये आत्महत्या होण्याचे प्रकारसुद्धा समोर येऊ लागले आहेत. ही स्थिती अत्यंत गंभीर असून छोटे व्यापारी, छोटे उद्योजक व व्यावसायिक यांना आर्थिक आधाराची गरज आहे. तसेच सर्वच व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांना शासकीय नियमांच्या पूर्ततेमध्ये लोकडाऊनमुळे अडचणी येत असल्याने करांची विवरणपत्रे, दाखल करण्याच्या मुदतवाढीसारख्या तांत्रिक बाबींवर सरकारने तातडीने निर्णय घेऊन दिलासा देण्याची गरज असल्याची मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी उमेश दाशरथी मधुसूदन रुंगठा, कैलास खंडेलवाल यांनी उद्योग क्षेत्र तर राजेंद्र बाठिया, संजय शेटे, हर्षवर्धन सिंघी, रामजीवन परमार यांनी व्यापार क्षेत्रासमोरील अडचणी मांडल्या.

इन्फो...

न्यायालयीन प्रक्रिया सुरू करणार

औरंगाबाद उच्च न्यायालयामधील विधिज्ञ अ‍ॅड. केशव चावरे, पुणे जिल्हा व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. फतेचंद राका यांनी या आदेशामधून जीवनावश्यक श्रेणीमध्ये नसलेला व्यापार सुरू करण्यासंबंधी न्यायालयीन दिलासा मिळण्याच्या दृष्टिकोनातून उपलब्ध पर्यायांचे सविस्तर विवेचन केले. त्यादृष्टीने पुढील प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.