ऊस उत्पादकांना एकरकमी पैसे द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:31 AM2019-01-12T00:31:53+5:302019-01-12T00:32:29+5:30

जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकºयांना नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.मधील बचत खात्यातील जमा पैसे एकरकमी मिळावे, यासाठी भारतीय मानवाधिकार परिषदेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन देण्यात आले.

Give a lump sum to sugarcane growers | ऊस उत्पादकांना एकरकमी पैसे द्यावे

निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना संतोष धात्रक, उमा सोनवणे, कृष्णा शिंदे, सविता खंडारे.

Next
ठळक मुद्देमानवाधिकार परिषदेचे निवेदन

नाशिक : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकºयांना नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.मधील बचत खात्यातील जमा पैसे एकरकमी मिळावे, यासाठी भारतीय मानवाधिकार परिषदेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन देण्यात आले.
ऊस उत्पादक शेतकºयांचे साधारण दीड वर्षापासून उसाचे जमा पैसे आहेत, परंतु ते त्यांना वेळेवर मिळत नाही. त्यामुळे घरगुती आर्थिक गरजा, शेतीसाठी भांडवल, मुलींची लग्ने आणि त्याहीपेक्षा खासगी सावकार तसेच इतर बँकांचे वसुली अधिकारी घरी येऊन त्रास देत आहे, तसेच तडजोड केलेल्या कर्जाची एकरकमी रक्कम न भरता आल्यामुळे खूप मोठे नुकसान होत आहे म्हणून या सर्व कारणांचा विचार करता शेतकरी स्वत:च्या कष्टाचे पैसे असूनही ते वेळेवर मिळत नसल्याने हतबल झाले आहे त्यामुळे बरेच शेतकरी आत्महत्या करत आहेत असेदेखील निवेदनात म्हटले आहे.
यावेळी परिषदेचे पश्चिम भारत अध्यक्ष संतोष धात्रक, शहराध्यक्षा उमा सोनवणे, कृष्णा शिंदे, जिल्हा अध्यक्ष अतुल सोनारे, सविता खंडारे, समाधान सानप, विजय काकड व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
धनादेश वटले नाहीत
शेतकºयांनी इतर बँकांना दिलेले धनादेश खात्यावर पैसे जमा असूनही वटले जात नाही. तरी या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून ऊस उत्पादक शेतकºयांना त्यांचे जमा पैसे एकरकमी मिळावे तसेच इतर बँकांना दिलेले धनादेश वटावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Web Title: Give a lump sum to sugarcane growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.