शहीद जवानाच्या वीरपत्नीने दिला कन्यारत्नाला जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:57 IST2018-11-19T00:56:58+5:302018-11-19T00:57:36+5:30

गेल्या रविवारी पाकने केलेल्या गोळीबारात शहीद झालेले सिन्नर तालुकातील शिंदेवाडी येथील जवान केशव सोमगीर गोसावी यांच्या वीरपत्नी यशोदा गोसावी यांना रविवारी सायंकाळी कन्यारत्न झाले.

The girl gave birth to daughter-in-law of Shaheed Javana's widow | शहीद जवानाच्या वीरपत्नीने दिला कन्यारत्नाला जन्म

शहीद जवानाच्या वीरपत्नीने दिला कन्यारत्नाला जन्म

सिन्नर : गेल्या रविवारी पाकने केलेल्या गोळीबारात शहीद झालेले सिन्नर तालुकातील शिंदेवाडी येथील जवान केशव सोमगीर गोसावी यांच्या वीरपत्नी यशोदा गोसावी यांना रविवारी सायंकाळी कन्यारत्न झाले.
रविवारी (दि. ११) केशव गोसावी (२९) हे जम्मू-काश्मीरच्या राजोरी सेक्टरमध्ये सीमेवर गस्त घालत होते. पाकने केलेल्या गोळीबारात त्यांना आठ दिवसांपूर्वीच वीरमरण आले. त्यांच्या पत्नी यशोदा यांना नववा महिना लागला होता. पहिल्या बाळंतपणासाठी मुलीला घेण्यासाठी येणाऱ्या माता-पित्यावर जावयावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली होती. दरम्यान, वीरपत्नी यशोदा यांनी रविवारी (दि. १८) मुलीला जन्म दिला. सिन्नर येथील रु ग्णालयात प्रसूती झाली.

Web Title: The girl gave birth to daughter-in-law of Shaheed Javana's widow