पाझर तलावात बुडून मुलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 00:19 IST2020-04-16T23:11:11+5:302020-04-17T00:19:15+5:30

नाशिकरोड : नाशिक तालुक्यातील चांदगिरी येथे गुरुवारी (दि.१६) सकाळी पाझर तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका १७ वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

 Girl dies in drowning lake | पाझर तलावात बुडून मुलीचा मृत्यू

पाझर तलावात बुडून मुलीचा मृत्यू

नाशिकरोड : नाशिक तालुक्यातील चांदगिरी येथे गुरुवारी (दि.१६) सकाळी पाझर तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका १७ वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तर तिच्या दुसऱ्या मैत्रिणीला वाचविण्यात गावकऱ्यांना यश आले आहे. आकांक्षा दिलीप बागुल असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.
चांदगिरी गावात राहणाºया आकांक्षा दिलीप बागुल (१७) व ऋतुजा तानाजी कटाळे (१९) या दोघी गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास गावातील पाझर तलावावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी आकांक्षा ही तलावात पाणी घेण्यासाठी गेली असता तिचा पाय घसरून तोल गेल्याने ती पाण्यात बुडत गटांगळ्या खाऊ लागली. यावेळी मैत्रीण ऋतुजा ही आकांक्षाला वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असताना पाण्यात बुडू लागली. यावेळी आजूबाजूच्या महिलांनी आरडाओरड केल्याने जवळच शेतीकाम करत असलेले भरत राजू कटाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाझर तलावात बुडत असलेल्या आकांक्षाला वाचविण्यास गेलेली ऋतुजादेखील बुडत असताना भरत कटाळे यांनी तिचे केस पकडून बाहेर काढले. बेशुद्ध पडलेल्या ऋतुजाला त्वरित रुग्णालयात नेऊन प्राथमिक उपचार करण्यात आले. सुदैवाने तिला वेळीच तलावातून बाहेर काढल्याने प्राण वाचले.





 

Web Title:  Girl dies in drowning lake

टॅग्स :Nashikनाशिक