शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

नाशिकमधील घरफोड्या; नेपाळमध्ये हॉटेल व्यावसायिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 1:11 AM

नाशिकमध्ये घरफोडी केल्यानंतर नेपाळला पळून जायचे, त्या ठिकाणी हॉटेल खरेदी करायचे व पुन्हा पैशांची निकड भासली की नाशिकला घरफोडीसाठी परतणारा सराईत घरफोड्या संशयित गणेश भंडारे यास शहर गुन्ह शाखेच्या युनिट-१ ने अटक केली आहे़

नाशिक : नाशिकमध्ये घरफोडी केल्यानंतर नेपाळला पळून जायचे, त्या ठिकाणी हॉटेल खरेदी करायचे व पुन्हा पैशांची निकड भासली की नाशिकला घरफोडीसाठी परतणारा सराईत घरफोड्या संशयित गणेश भंडारे यास शहर गुन्ह शाखेच्या युनिट-१ ने अटक केली आहे़ टागोरनगरमधील भरत गांग यांच्या बंगल्याच्या खिडकीचे गज कापून लाखो रुपयांचे दागिने चोरल्याच्या गुन्ह्यासह आणखी दोन गुन्ह्यांची कबुली संशयित भांडारे याने दिली असून, त्याच्याकडून १४ लाख रुपयांचे ५४७ ग्रॅम सोने हस्तगत केले आहे. चोरीचे सोने विकत घेणाºया मुंबईतील एका संशयितास अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी बुधवारी (दि़२१) पत्रकार परिषदेत दिली़ सिंगल यांनी सांगितले की, आॅक्टोबर २०१६ मध्ये टागोरनगरमध्ये भरत दीपचंद गांग यांच्या बंगल्याच्या खिडकीचे गज कापून लाखो रुपयांच्या सोन्याच्या दागिन्याची चोरी केल्याची घटना घडली होती़ संशयित गणेश भंडारे यानेच ही घरफोडी केल्याचे पोलीस तपासात समोर आले होते, मात्र या घटनेनंतर तो नेपाळमध्ये फरार झाला होता़ नेपाळमध्ये त्याच्या शोधासाठी गेलेल्या पथकास गुंगारा देण्यात भंडारे यशस्वी झाला होता़ शहर गुन्हे शाखा युनिट-१ चे सहायक पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांना भंडारे नाशिकमध्ये आल्याची माहिती मिळाली होती़ व्हॅलेंटाइन डे अर्थात १४ फेब्रुवारी रोजी युनिट एकने सीबीएस परिसरात भंडारे यास सापळा लावून अटक केली़  संशयित भंडारेची कसून चौकशी केल्यानंतर त्याने उपनगरमध्ये दोन तर गंगापूर पोलीस ठाण्यात एक अशा तीन घरफोड्यांची कबुली दिली़ घरफोडीतील चोरीचे सोने पॉलिश करून देणारा तसेच खरेदी करणारा मुंबईतील दीपक देवरुखकरची माहिती दिल्यानंतर त्यासही मुंबईतून अटक करण्यात आली आहे़ या दोघांकडून तीन घरफोड्यांमधील सुमारे १३ लाख ६७ हजार ५०० रुपयांचे ५४७ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे़  आयुक्त डॉ. सिंगल, उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक आयुक्त अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक निरीक्षक नागेश मोहिते, महेश कुलकर्णी, दिलीप मोंढे, विशाल देवरे, स्वप्नील जुंद्रे, प्रवीण चव्हाण यांच्या पथकाने ही कामगिरी केली़रिसॉर्ट खरेदीसाठी पैशांची आवश्यकतासराईत भंडारे याने नेपाळी युवतीशी विवाह केला व चोरीच्या पैशातून दोन हॉटेल खरेदी केले़ आणखी एक रिसोर्ट खरेदी करण्यासाठी त्यास पैशांची आवश्यकता असल्याने तो नाशिकला आला होता़ येथे घरफोडी करून त्या पैशातून हे रिसॉर्ट खरेदी करायचे होते. दरम्यान, नाशिक पोलिसांनी भंडारेच्या शोधासाठी इंटरपोलकडेही प्रस्ताव दिला होता.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा