मांजात अडकलेल्या बगळ्याची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 17:23 IST2020-12-29T17:22:07+5:302020-12-29T17:23:21+5:30
दिंडोरी : तालुक्यातील पालखेड रस्त्यावरील चिंचेच्या झाडावर पतंगाच्या मांजात अडकलेल्या बगळ्याची सुटका करण्यात युवकाच्या प्रयत्नांना यश आले.

मांजात अडकलेल्या बगळ्याची सुटका
दिंडोरी : तालुक्यातील पालखेड रस्त्यावरील चिंचेच्या झाडावर पतंगाच्या मांजात अडकलेल्या बगळ्याची सुटका करण्यात युवकाच्या प्रयत्नांना यश आले.
दिंडोरी येथील पालखेड रस्त्यावर जुने चिंंचेचे झाड आहे. त्यावर पतंगाचा मांजा गुंतलेला होता. बगळा त्या झाडावर बसलेला असतांना हवेने मांजा बगळ्यांच्या मानेला अडकला. बगळ्यांने त्यातून आपली सोडवणूक करण्याचा बराच प्रयत्न केला, परंतु मांजा निघाला नाही. झाड ऊंच असल्याने कोणी झाडावर जाण्याची हिंमत दाखवित नव्हते.
बघ्याची गर्दी भरपूर होती. परंतु मांजा बगळ्यांची मान अधिकच घट्ट अडकू लागला. झाडाच्या उंचीवर हा प्रकार घडत असल्याने या बगळ्याची अडकेल्या मांजातून सुटका करण्याकरीता कोणीही काही करु शकणे अशक्य असल्याने या रस्त्याने जाणशऱ्या तालुक्यातील अंबाड येथील युवक मुरलीधर गवळी याने सदर प्रकार पाहून क्षणांचाही विलंब न करता झाडावर चढला व त्याने मरणांच्या दाढेतुन बगळ्यांची सुखरूप सुटका केली.
बगळ्याची या मांजातून सुटका होताच बगळ्यांने पुन्हा आकाशात भरारी घेतली. बगळ्याला वाचविणारा युवक मुरलीधर गवळी यांचा गावाच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.