शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्य ग्राहकांसाठी वरण स्वस्त, भात महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:48 IST

यंदा देशात उडीद, मूग, तूर, हरभराच्या बंपर उत्पादनामुळे मागील वर्षाच्या तुलनेत डाळींचे भाव क्विंटलमागे ६०० ते तीन हजार रु पयांपर्यंत घसरले आहेत, तर बासमती तांदळाची वाढलेली निर्यात व अन्य भात पिकांचा उतारा घटल्याने तांदळाचे भाव क्विंटलमागे ५०० ते २००० हजार रु पयांनी दरम्यान वाढले आहेत. त्यामुळे यंदा वरण स्वस्त, तर भात महाग अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

नाशिक : यंदा देशात उडीद, मूग, तूर, हरभराच्या बंपर उत्पादनामुळे मागील वर्षाच्या तुलनेत डाळींचे भाव क्विंटलमागे ६०० ते तीन हजार रु पयांपर्यंत घसरले आहेत, तर बासमती तांदळाची वाढलेली निर्यात व अन्य भात पिकांचा उतारा घटल्याने तांदळाचे भाव क्विंटलमागे ५०० ते २००० हजार रु पयांनी दरम्यान वाढले आहेत. त्यामुळे यंदा वरण स्वस्त, तर भात महाग अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. देशांतर्गत डाळींचे उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने योजना विविध योजना आणल्या. त्यात पोषक वातावरणामुळे मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात व कर्नाटक या राज्यात मूग, उडीद पिकांचे भरघोस उत्पादन झाले आहे. सरकारकडे व व्यापारांकडे मागील वर्षीची तूरडाळ मोठ्या प्रमाणात शिल्लक असतानाच यावर्षीही मोठ्या प्रमाणात पीक आल्याने डाळींचे भाव गेल्या वर्षाच्या तुलनेत घसरले आहेत, तर सुगंध व चवीने खवय्यांना आकर्षित करणारा बासमतीला सध्या विदेशातून मोठी मागणी आहे. यात सर्वाधिक मागणी इराण, इराक, सौदी अरेबिया, संयुक्त अमिरातील या आखाती देशांतून होत आहे. इराणने या वर्षी बासमती तांदळाची आयात वाढविली आहे. त्याच-बरोबर, युरोपियन महासंघातील देश व अमेरिकाही मागील काही वर्षांच्या तुलनेत जास्त बासमती तांदूळ खरेदी करीत आहे. यामुळे बासमतीमध्ये मागील हंगामाच्या तुलनेत यंदा दोन हजार रु पयांपर्यंत भाववाढ झाली आहे. अस्सल बासमती सध्या दहा हजार ते आकरा हजार रु पये प्रति क्विंटलने विकला जात आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत बासमती तांदूळही एक ते दोन हजार रुपयांनी वधारला आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०१७ या काळात देशातून ६३ लाख टन तांदळाची विक्र मी निर्यात झाली आहे, अशा परिस्थितीत भात (धान) उत्पादनात उतारा ३० टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळे देशात हंगामाच्या सुरु वातीलाच तांदळात क्विंटलमागे ५०० ते २००० रु पयांपर्यंत भाववाढ झाल्याने गेल्या दोन वर्षांपूर्वी सर्वसामन्यांच्या ताटातून हद्दपार झालेले वरण स्वस्त झाले आहे. त्यामुळे रोजच्या आहारातील भात मात्र महागला असला तरी यावर्षी गव्हाचे दर स्थिर असून, साखरीचे दर तीन ते चार रुपयांनी घसरल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये तांदूळ दरवाढीमुळे निर्माण झालेली नाराजी काही अंशी कमी झाल्याची दिसून येत आहे.साखर घसरली, तेल वधारलेअन्नधान्यासह यावर्षी इतर मालाच्या भावातही चढ-उतार झाले आहेत. यात प्रामुख्याने साखरीचे दर प्रतिकिलोला पाच ते सहा रुपयांनी घसरले आहेत, तर खाद्यतेलाचा १५ लिटरचा डबा ३० ते ४० रुपयांनी महागला आहे. थोडक्यात स्वयंपाकघरातील काही वस्तू महागल्या असल्या तरी काही वस्तू स्वस्त झाल्यामुळे गृहिनींना किचनचे बजट जुळविणे शक्य झाल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक