नाशिक : शहर जीबीएसच्या संक्रमणापासून दूर होते. पण, आता थेट शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुणे आणि सोलापूरमध्ये कहर करणाऱ्या गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात 'जीबीएस'चा नाशिकमध्येही रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे. पाथर्डी फाट्याजवळील ६० वर्षीय व्यक्तीला जीबीएस पॉझिटिव्ह सापडला असून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. नाशिककरांनी घाबरून न जाता सावधानता बाळगावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव आश्रमशाळेत एक विद्यार्थी संशयित आढळला होता. शहरात आतापर्यंत जीबीएसचा कोणताही रुग्ण आढळून आला नव्हता. पण आता थेट महापालिका क्षेत्रातच थेट शिरकाव झाल्याने भीतीचे वातावरण आहे.
उपचारदेखील महागशरीराची रोगप्रतिकारक शक्ती जेव्हा जिवाणू किंवा विषाणूजन्य संसर्गाला भिडत असते, तेव्हा चुकून मेंदूचे सिग्नल वाहून नेणाऱ्या घटकावर हल्ला करते. ज्यामुळे अशक्तपणा, अर्धांगवायू किंवा इतर गंभीर आजार उद्भवू शकतात. डॉक्टरांनी सांगितलं की, ८० टक्के बाधित रुग्ण रुग्णालयातून डिस्वार्ज झाल्यानंतर व्यवस्थित चालण्या फिरण्यासाठी सहा महिने लागू शकतात. पण काहींना त्यांच्या अवयवांची पूर्ण हालचाल पूर्ववत होण्यासाठी वर्षभर किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. विशेष म्हणजे या आजारावरील उपचार उपचार देखील खूप महाग आहेत.
आरोग्य विभाग अलर्टराज्यात अडीचशेहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे पुणे व सोलापूर येथे आहे. आतापर्यंत या आजाराने बारा जणांचा मृत्यू झाला आहे. दूषित पाण्यातून व मानवी विष्ठेतून हा आजार मोठ्या प्रमाणात फैलावत असल्याचे निदर्शनास आले आहे. नाशिकमध्ये त्याचा रुग्ण २ सापडल्याने चिंतेचे वातावरण आहे. पाथर्डी फाटा येथील बाधितास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा चाचणी अहवालही पॉझिटिव्ह आला होता. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना जिल्हा 3 रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 'जीबीएस'च्या शिरकावामुळे मनपा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर असून लक्षणे आढळल्यास तत्काळ तपासणी करून घ्या, असे आवाहन केले आहे.