ग्रामपालिकेच्या वतीने अंगणवाड्यांना गॅस वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 00:13 IST2020-03-14T23:29:05+5:302020-03-15T00:13:45+5:30
विंचूर येथील ग्रामपालिकेच्या शेष निधीअंतर्गत गावातील १७ अंगणवाडी शाळांंना गॅस व कुकरचे वाटप करण्यात आले. अंगणवाड्यांना पोषण आहार शिजविण्यासाठी कुठलीही व्यवस्था नव्हती. निधीअंतर्गत अंगणवाड्यांना गॅस संच व १२ लिटरच्या कुकरचे वाटप करण्यात आले.

विंचूर ग्रामपालिकेच्या वतीने शेष निधीअंतर्गत अंगणवाडी शाळांंना गँस व कुकरच्या वाटपप्रसंगी संजय शेवाळे, सरपंच वंदना कानडे, भास्कर परदेशी, धनंजय पवार, सुनीता पवार, वैशाली जेऊघाले, मधुकर दरेकर, ताराबाई क्षीरसागर आदी.
विंचूर : येथील ग्रामपालिकेच्या शेष निधीअंतर्गत गावातील १७ अंगणवाडी शाळांंना गॅस व कुकरचे वाटप करण्यात आले.
अंगणवाड्यांना पोषण आहार शिजविण्यासाठी कुठलीही व्यवस्था नव्हती. अंगणवाड्यांची ही गैरसोय लक्षात घेता ग्रामपालिकेच्या वतीने सन २०१९-२० या आर्थिक वर्षातील ग्रामपालिकेच्या उत्पन्नातील १० टक्के निधी हा बालकल्याण योजनेसाठी खर्च करावयाचा असल्याने या निधीअंतर्गत अंगणवाड्यांना गॅस संच व १२ लिटरच्या कुकरचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी निफाड पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे, विंचूर ग्रामपालिकेच्या सरपंच वंदना कानडे, उपसरपंच भास्कर परदेशी, सदस्य धनंजय पवार, सुनीता पवार, वैशाली जेऊघाले, मधुकर दरेकर, ताराबाई क्षीरसागर, नंदिनी क्षीरसागर, रिहाना मोमीन, आत्माराम दरेकर, प्रकाश
मोरे, उषा राऊत, अविनाश दुसाने, नीरज भट्टड, नानासाहेब
जेऊघाले, संगीता सोनवणे,
अंजूम शेख, ग्रामविकास अधिकारी जी. डी. खैरनार, मुख्य लिपिक बाळासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.