शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

वातावरणात गारठा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 12:57 AM

नाशिक : शहराचा किमान तापमानाचा पारा ११ अंशांवरून १३.६ अंशांपर्यंत रविवारी (दि.२९) वर सरकला; मात्र थंड वाऱ्याचा वेग शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारीदेखील टिकून राहिल्यामुळे नाशिककरांना दिवसभर वातावरणात गारठा जाणवला. संध्याकाळ होताच पुन्हा थंडीचा जोर वाढल्याचा अनुभव नाशिककरांना आला. यामुळे रविवारची सुटी असूनही रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला.

ठळक मुद्देपारा १३.६ : ढगाळ हवामान तरीही थंड वारे

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहराचा किमान तापमानाचा पारा ११ अंशांवरून १३.६ अंशांपर्यंत रविवारी (दि.२९) वर सरकला; मात्र थंड वाऱ्याचा वेग शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारीदेखील टिकून राहिल्यामुळे नाशिककरांना दिवसभर वातावरणात गारठा जाणवला. संध्याकाळ होताच पुन्हा थंडीचा जोर वाढल्याचा अनुभव नाशिककरांना आला. यामुळे रविवारची सुटी असूनही रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला.शहरात शुक्रवारी सकाळपासून थंड वारे वेगाने वाहू लागल्यामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला आहे.थंडीचा कडाका वाढताच बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना पहावयास मिळत आहे. बहुतांश नागरिकांना सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवू लागला आहे. किमान तपमानात घट शनिवारी पारा अधिकच घसरल्यामुळे नाशिककरांना हुडहुडी भरली. या हंगामातील सर्वाधिक नीचांकी ११.४ अंशांपर्यंत तापमानाचा पारा शनिवारी घसरला होता. त्या तुलनेत रविवारी अंशत: दिलासा मिळाला. मागील तीन ते चार दिवसांपासून शहराचे किमान तापमान १५ अंशांच्या जवळपास स्थिरावत होते; मात्र शुक्रवारपासून किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली. नाशिककरांना कडाक्याची थंडी जाणवू लागली. शहरासह निफाड व मालेगाव तालुकादेखील चांगलाच गारठला आहे. मालेगावात ११.८ अंश इतके किमान तापमान रविवारी नोंदविले गेले.

टॅग्स :city chowkसिटी चौकNashikनाशिक