रानभाज्यांची शहरी खवय्येगिरी जंगल, आदिवासींच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:32 AM2018-10-29T00:32:29+5:302018-10-29T00:33:05+5:30

दुर्गम भागामध्ये, आदिवासी खेड्यापाड्यात सहजतेने उगवणाऱ्या पोषक, अस्सल रानभाज्यांची शहरी खवय्यांना चटक लागली आहे. पण दोन पैशांच्या मोबदल्यात शहरवासीयांची ही खवय्येगिरी मूळ आदिवासींच्या कुपोषणाला कारणीभूत तर ठरणार नाही ना? अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.

 The gardens of the gardens, the villagers, the tribals | रानभाज्यांची शहरी खवय्येगिरी जंगल, आदिवासींच्या मुळावर

रानभाज्यांची शहरी खवय्येगिरी जंगल, आदिवासींच्या मुळावर

Next

नाशिक : दुर्गम भागामध्ये, आदिवासी खेड्यापाड्यात सहजतेने उगवणाऱ्या पोषक, अस्सल रानभाज्यांची शहरी खवय्यांना चटक लागली आहे. पण दोन पैशांच्या मोबदल्यात शहरवासीयांची ही खवय्येगिरी मूळ आदिवासींच्या कुपोषणाला कारणीभूत तर ठरणार नाही ना? अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. याशिवाय या रानभाज्यांच्या अतिरिक्त तोडणीमुळे जंगलांना हानी पोहोचण्याचीही भीती निर्माण झाली आहे. याविषयी पर्यावरण अभ्यासक जुई पेठे यांनी पाहणी केली असून, त्यांना या पाहणीत धक्कादायक गोष्टी आढळून आल्या आहेत.
गेल्या काही वर्षांपासून जुई या रानभाज्यांचा अभ्यास करत आहेत. राज्यभरात हजारो तर नाशिक जिल्ह्यात सव्वाशेच्यावर रानभाज्यांचे प्रकार आढळत असून, त्यातले बरेचसे प्रकार आता शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री येत आहेत. पैशांच्या हव्यासापायी आदिवासींना चुकीचे मार्गदर्शन करून या रानभाज्यांचे व्यावसायिकीकरण केले जात आहे. त्यामुळे आदिवासींची नैसर्गिक संसाधने कमी होणे, त्यांना पैशाची चटक लागणे, शहरी लोकांकडून जंगलांचा ºहास होणे हे परिणाम पाहणीत ठळकपणे दिसून आले.
पाहणीत आढळलेल्या गोष्टी
सध्या शहरी भागातून रानभाज्यांना मागणी वाढली आहे. शहरांमध्ये रानभाज्यांची प्रदर्शने भरवली जात आहेत. शहरी खवय्यांना रानभाज्यांविषयीचे आकर्षण वाढलेले आहे. जंगले नष्ट होत असून, रानभाज्यांच्या वेली कमी होत चालल्या आहेत. महामार्गांवर रानभाज्या विकणाºया आदिवासींच्या जागी आता शहरी मध्यस्थही दिसू लागले आहेत. मूळ आदिवासींचे जगणे अवघड बनत चालले आहे. दर वीक एंडला मध्यस्थ शहरी नागरिकांचे जथ्थे जंगलात आणत आहेत. या जथ्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात भाज्या तोडल्या जात असून स्थानिक आदिवासींना त्या शिजवून देण्यास सांगितले जात आहे. एकावेळी जवळपास ५०० लोक जंगलात जाऊन कर्टुले, कोवळे बांबू, फोडशी, काळे वेल, निळे वेल, रुखाळू व इतर रानभाज्या तोडून जंगले रिकामी करत आहेत. रानभाज्यांबरोबर इतरही वनस्पती उपटल्या जात आहेत. मूळ आदिवासींसाठीच असणाºया रानभाज्यांना शहरी भागातून मागणी वाढत असल्याने आदिवासी लोक महामार्गांवर, शहरांमध्ये हा रानमेवा आणून विकत आहेत. बºयाचदा आदिवासी बांधवांना टाळून शहरी भागातले मध्यस्थ, व्यावसायिकही या व्यवसायात उतरले आहेत. वृक्षारोपणाचे प्रमाण कमी होत चालले आहे. हा रानमेवा आदिवासी विकत सुटले असून स्वत: मात्र उपाशी राहात आहेत आणि कुपोषणाची शिकार होत आहेत. हल्ली ग्रामीण पर्यटनाच्या नावाखाली शहरी भागातील मंडळी रानावनात फिरताना जंगलांचे नुकसानही करत आहेत. या प्रकारात शहरी भागातल्या मध्यस्थांची भूमिका संशयास्पद आहे. ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळवून देण्याच्या हेतूने आपण हे करत असल्याचे ते सांगत असले तरी कृती मात्र त्याच्या अगदी विरुद्ध असल्याचे दिसून येत आहे.
आजकाल शहरी नागरिकांचे रानभाज्यांविषयीचे बेगडी प्रेम वाढले आहे. मुळात जंगल कमी होत चालले आहे. जंगली भाज्या संपुष्टात आल्या आहेत. शहरी लोकांना भाज्यांविषयी प्रेम नाही. त्यांना सुटीच्या दिवशी केवळ चवीत बदल हवा असतो. ते जंगलात जातात, भाज्यांबरोबर दिसेल ते ओरबाडून काढतात. नाजूक रानवेली पायदळी तुडवतात. निसर्गाचे नुकसान करतात. खरे तर या निसर्गात फारसा मानवी हस्तक्षेप नको, पण दुर्दैवाने तो वाढत चालला आहे. तो थांबला पाहिजे.
- शेखर गायकवाड, पर्यावरणप्रेमी
शहरी भागातील लोक जंगलात येऊन रानभाज्या तोडून, विकत घेऊन जातात. घरी गेल्यावर त्या भाज्या कशा करायच्या तेही बºयाचदा त्यांना समजत नसते. शिजवतात, वाफावतात, चव आवडली नाही तर फेकून देतात. सोशल मीडियावर माहिती वाचून भाज्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. त्यात निसर्गाचे नुकसान होत आहे. शासनाचा जैवविविधता विभाग याविषयी कोणतेही धोरण आखत नसल्याने शहरी खवय्यांना रान मोकळे झाले आहे. जंगलाचे अस्तित्व यामुळे धोक्यात आले.

Web Title:  The gardens of the gardens, the villagers, the tribals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.