पाटोळेत ग्रामपंचायतीकडून कचराकुंड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 15:29 IST2020-03-01T15:29:09+5:302020-03-01T15:29:34+5:30
सिन्नर : तालुक्यातील पाटोळे येथे गावातील स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेत सार्वजनिक ठिकाणांसह घर व परिसरात कचरा पडून राहू नये, ...

सिन्नर तालुक्यातील पाटोळे येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात कचराकुंड्याचे लोकार्पण करताना सरपंच मेघराज आव्हाड, आर. डी. तायडे. समवेत ग्रामस्थ.
सिन्नर : तालुक्यातील पाटोळे येथे गावातील स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेत सार्वजनिक ठिकाणांसह घर व परिसरात कचरा पडून राहू नये, कचऱ्याची विल्हेवाट लागावी यासाठी कचराकुंड्या ठेवण्यासह त्यापासून कंपोस्ट खत तयार करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानिमित्ताने गावात ११ कुंड्याचे वितरणही करण्यात आले आहे.
ग्रामपंचायतीच्यावतीने गावांतर्गत स्वच्छता राखण्यासाठी कचरा कुंड्यांची व्यवस्था केली आहे. सरपंच मेघराज आव्हाड, नाशिक डाक विभागाचे प्रवर अधिक्षक आर. डी. तायडे यांच्या हस्ते कुंड्याचे लोकार्पण करण्यात आले. गावात सिमेंट रस्ते व भुमिगत गटारी झाल्याने गाव स्वच्छ सुंदर दिसु लागले. रस्त्यांभोवती व सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. पंरतु तरी देखील कागद, प्लास्टिक व घरातील कचरा यामुळे परीसरात अस्वच्छता दिसत होती. यासाठी ग्रामपंचायतीने गावातील चौका चोकात कचरा कुंड्या ठेवण्याचे नियोन केले. १० ते १५ कुटुंबामागे एक कचराकुंडी ठेवण्यात आली असून त्या कुंडीच्या सरक्षंणाची जबाबदारी कुटुंबावर सोपवण्यात आली आहे. त्यात सुका कचरा कचरा टाकण्याचे आव्हान करण्यात आले. जमा होणारा कचºयापासून कंपोस्ट खताची निर्मिती करण्या संबंधात ग्रामपंचायत प्रयत्न करणार असल्याचे सरपंच आव्हाड यांनी सांगीतले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, जेष्ठ नागरीक उपस्थीत होते. या उपक्र माचे सर्व ग्रामस्थांनी स्वागत केले.