शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

अधिकाऱ्यांच्या टेबलवर ओतला कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 1:16 AM

मनमाड नगरपालिकेच्या शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरात विविध समस्यांसह घाणीचे साम्राज्य पसरल्याचा मुद्दा उपस्थित करून सत्ताधारी पक्षासह सर्वच नगरसेवकांनी गोंधळ घालत प्रशासनाला धारेवर धरले. संतप्त नगरसेवकांनी अधिकाºयांच्या टेबलावर घाण व कचरा टाकून संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देमनमाडला ठिय्या आंदोलन पालिकेच्या सभेमध्ये गोंधळ

मनमाड : नगरपालिकेच्या शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरात विविध समस्यांसह घाणीचे साम्राज्य पसरल्याचा मुद्दा उपस्थित करून सत्ताधारी पक्षासह सर्वच नगरसेवकांनी गोंधळ घालत प्रशासनाला धारेवर धरले. संतप्त नगरसेवकांनी अधिकाºयांच्या टेबलावर घाण व कचरा टाकून संताप व्यक्त केला.विकासकामे का रोखून धरली, डेली भाजी मार्केटचे अर्धवट असलेले काम कधी पूर्ण होणार? यासह इतर प्रश्न उपस्थित करून तब्बल एक तासापेक्षा जास्त वेळ नगरसेवकांनी सभागृहाच्या वेलमध्ये ठिय्या आंदोलन केले. शनिवारच्या सभेत कोणतीही करवाढ व दरवाढ नसलेला ६ लाख ४५ हजार ७८० रुपये शिलकीचा अर्थसंकल्प एकमताने मंजूर करण्यात आला.पालिकेच्या डॉ. आंबेडकर सभागृहात नगराध्यक्ष पद्मावती धात्रक यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर मुख्य लेखापाल नाना जाधव यांनी सन २०२०-२१ साठीचे सुमारे १०५ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले. अंदाजपत्रकावर चर्चा होऊन ते एकमताने मंजूर करण्यात आल्यानंतर सर्वसाधारण सभेच्या कामकाजाला सुरु वात झाली.शिवसेनेचे गटनेते गणेश धात्रक यांनी शहरातील अर्धवट विकासकामांचा मुद्दा उपस्थित केला, तर गंगाभाऊ त्रिभुवन यांनी डेली भाजी मार्केटचे रखडलेले काम, संगीता पाटील यांनी साफसफाईचा मुद्दा उपस्थित करीत वेलमध्ये येऊन ठाण मांडले. त्यांना पाठिंबा गणेश धात्रक, छोटू पाटील, अमजद पठाण यांच्यासह सर्वच नगरसेवक वेलमध्ये आले व त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. या दरम्यानच शिवसेनेचे नगरसेवक लियाकत शेख यांनी गोणीत भरून आणलेली घाण व कचरा अधिकाºयांच्या टेबलवर टाकला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे एकच गोंधळ उडालाया सभेत २० ठराव मंजूर करण्यात आले असून, आयत्या वेळचे तीन विषयही मंजूर करण्यात आले. सभेला सर्व नगरसेवक उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकGarbage Disposal Issueकचरा प्रश्न