कचरा डेपोला आग; डाळिंबबाग खाक

By Admin | Updated: April 15, 2017 01:08 IST2017-04-15T01:06:07+5:302017-04-15T01:08:34+5:30

कचरा डेपोला आग; डाळिंबबाग खाक

Garbage dePola fire; Pomegranate bark | कचरा डेपोला आग; डाळिंबबाग खाक

कचरा डेपोला आग; डाळिंबबाग खाक

सटाणा : मुख्य वीजवाहिनीच्या शॉर्टसर्किटमुळे सटाणा नगरपालिकेच्या कचरा डेपोला भीषण आग लागली. डेपोलगत माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे यांच्या बहार आलेल्या डाळिंबबागेतील तब्बल चारशे झाडे जळून खाक झाली. यात सोनवणे यांचे मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारी (दि. १४) दुपारी १ वाजता लागलेली आग सायंकाळी ८ वाजेपर्यंत धगधगत होती. चौगाव बर्डी परिसरात धुराचे लोळ पसरले आहे.
सटाणा नगरपालिकेचा चौगाव बर्डी परिसरात कचरा डेपो आहे. डेपोवरून मुख्य वीजवाहिनी गेली आहे. शुक्रवारी दुपारी १ वाजता या तारांमध्ये घर्षण होऊन विजेच्या ठिणग्या डेपोत पडल्या. त्यामुळे कचरा डेपोला आग लागली. उन्हाची तीव्रता व सुक्या कचऱ्यामुळे आगीने क्षणार्थात रौद्र रूप धारण केले. यात शेजारील डाळिंबबाग खाक झाली. स्थानिक नागरिकांनी आगीची माहिती सटाणा अग्निशमन केंद्राला दिली. (वार्ताहर)

Web Title: Garbage dePola fire; Pomegranate bark