शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
4
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
5
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
6
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
7
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
8
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
9
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
10
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
11
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
12
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
13
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
14
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
15
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
16
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
17
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
18
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
19
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
20
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींच्या घरपट्टी कर आकारणीस स्थगिती

By admin | Updated: April 9, 2015 00:09 IST

शासनाच्या आदेशाचे परिपत्रक

नाशिक : उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेच्या अनुषंगाने शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने ग्रामपंचायतींच्या हद्दीत असलेल्या इमारतींवरील कर आकारणी (घरपट्टी कर ) पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्याचे आदेश एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत.५ एप्रिलला ग्रामविकास विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार ही स्थगिती देण्यात आली आहे. या परिपत्रकात म्हटले आहे की, मुंबई उच्च न्यायालयात १० नोव्हेंबर २०१४ रोजीच्या आदेशास अनुसरून ग्रामपंचायतींच्या मालमत्ता व कर आकारणीत समानता व सुसूत्रता ठेवण्याकरिता शासनास शिफारशी करण्याकरिता शासन निर्णय ९ जानेवारी २०१५ अन्वये एक अभ्यासगट स्थापन करण्यात आला आहे. या अभ्यासगटाचा अहवाल शासनास प्राप्त होऊन ग्रामपंचायतींच्या हद्दीतील बांधकामांवर कशाप्रकारे कर आकारणी करण्यात यावी, याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये ३ डिसेंबर १९९९ च्या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (सुधारणा) नियमातील नियम २ ते ४ मध्ये करण्यात आलेली सुधारणा रद्दबातल केली असल्याने या सुधारणेनुसार करण्यात येत असलेल्या कर वसुलीस पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात येत असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. तसेच कर वसुलीबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज यांनी सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या परिपत्रकाद्वारे कळविले आहे. (प्रतिनिधी) आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी बस्तेकळवण : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी सुनील उखाजी बस्ते यांची निवड करण्यात आली. डॉ आंबेडकर जयंती उत्सव समितीत विलास बस्ते, संजय बस्ते, नितीन बस्ते, अमोल बस्ते, बंटी बस्ते, सागर बस्ते, बाळू जगताप, पप्पू बस्ते, चेतन गोयर, विनोद गोयर, मुकेश बस्ते, सचिन बस्ते, संदीप केदारे, समाधान केदारे, दिनेश बस्ते, स्वप्नील धिवरे, कुंदन बस्ते आदींचा समावेश आहे.(वार्ताहर)