गोंदे फाटा अपघातात मुंबईचे चौघे गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 14:46 IST2019-04-15T14:45:02+5:302019-04-15T14:46:17+5:30
नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे (दुमाला) फाट्यावर असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलपंपाजवळ स्वीफ्ट गाडीच्या झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी राञी ११.४५ वाजेच्या दरम्यान घडली असून जखमींमध्ये एका महिलेचा सामावेश आहे.

गोंदे फाटा अपघातात मुंबईचे चौघे गंभीर जखमी
नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे (दुमाला) फाट्यावर असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलपंपाजवळ स्वीफ्ट गाडीच्या झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी राञी ११.४५ वाजेच्या दरम्यान घडली असून जखमींमध्ये एका महिलेचा सामावेश आहे. नाशिकहून मुंबईकडे जात असतांना स्वीफ्ट गाडी
क्र मांक ( एम.एम.०१,बी.जी.१५६१) या गाडी चालकाचा समोर गतिरोधक असल्यामुळे ब्रेक दाबण्याच्या स्थितीत ताबा सुटल्याने समोरच मुंबईकडे जात असलेल्या ट्रक क्र मांक (एम.एच.०४,एफ.व्ही.८८५४) या गाडीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात राणीसाहेब पाटील (४५), विजया रावसाहेब पाटील (३२), प्रीती रावसाहेब पाटील (१३), राजेश अदित्यप्रसाद पांडे (३०) सर्व राहणार मुंबई येथील असून हे चारही जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना गोंदे फाटा येथील जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रु ग्णवाहिकेतून उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोंदे फाटा येथील राष्ट्रीय महामार्गावर रस्ता दुरु स्तीचे काम चालू असल्यामुळे मुंबईकडे जाणा-या गाड्या टोलरस्त्याने जात आहेत. त्यामुळे दोन ते तीन दिवसांपासून या ठिकाणी वाहनांची गर्दी होत असल्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. बाजूलाच भाजी बाजार असल्यामुळे सायंकाळी येथे नागरिकांची देखील खरेदीसाठी गर्दी होत आहे. अधिक तपास वाडिव-हे पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत आहेत.