वाजतगाजत गणपती आले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 01:42 AM2019-09-03T01:42:26+5:302019-09-03T01:42:48+5:30

कुठे ढोल, कुठे हलगीचा नाद, कुठे लेजीम पथकाची मिरवणूक तर कुठे बालगोपाळांच्या पथकाच्या तडतड ताशाच्या स्वरात ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन झाले.

 Ganpati came to the doorstep! | वाजतगाजत गणपती आले!

वाजतगाजत गणपती आले!

Next

नाशिक : कुठे ढोल, कुठे हलगीचा नाद, कुठे लेजीम पथकाची मिरवणूक तर कुठे बालगोपाळांच्या पथकाच्या तडतड ताशाच्या स्वरात ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन झाले. भाविकांनी पारंपरिक वेश परिधान करीत घरोघरी सकाळच्या वेळेत तर सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
गणरायाचे घरोघरी साधेपणाने व पारंपरिक पद्धतीने आगमन झाले. पर्यावरण जागृतीमुळे भाविकांकडून यंदा इको फ्रेन्डली अर्थात शाडूमातीच्या मूर्तींना नागरिकांनी प्राधान्य दिले होते. अनेक नागरिकांनी गुरुजींकडून विधिवत पूजा करून घेत तर बहुतांश घरांमध्ये गणेश आरती आणि गणपती अथर्वशीर्ष पठणाद्वारे गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
सोमवारी सकाळपासूनच घरोघरी ‘गणपती बाप्पा मोरया, एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार’ असे जयघोष घुमू लागले. रविवार कारंजावरील सिद्धिविनायक, भद्रकालीतील साक्षी गणेश, गुलालवाडी मित्रमंडळाचा गणपती अशा सर्व मानाच्या गणपतींची पारंपरिक जल्लोषात प्रतिष्ठापना केली. नाशिकरोड, सिडको, सातपूर, पंचवटी येथेही गणेशोत्सवाचा जल्लोष करीत गणरायाची स्थापना करण्यात आली.
आरास सजावटीसाठी लागणाऱ्या विविध वस्तू व साहित्यांचे स्टॉल बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात लागले होते. यामध्ये पूजेसाठी लागणारे हार, फुले, दुर्वा, कापूर, केळी, कापूस, वस्त्र, नारळ, केवडा, कमळ, तोरण, मोरपीस अशा विविध साहित्यांची बाजारात रेलचेल होती. पूजेला लागणाºया फुलांबरोबरच फळांचीही मोठ्या प्रमाणावर विक्र ी झाली. पूजेला लागणाºया पाच फळांचे दर ४० ते ५० रु पये होते, तर पत्री १० ते २० रुपयांना होती. त्याशिवाय सोळा भाज्या एकत्र करून केलेली मिश्र भाजीदेखील ३० ते ४० रुपये दराने बाजारात मिळत होती. थर्माकोलला बंदी असल्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणावर प्लायवूड, पुठ्ठा, वेलवेट, एलईडी, लेस अशा आकर्षक सजावटीचे सिंहासन, बैठका, मंदिर-मखरे बाजारात दिसून येत होती. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने महानगरातील लहान, मोठ्या ढोल, ताशा पथकांनी तासाच्या हिशेबाने तर कुणी केवळ काही अंतराच्या हिशेबाने चांगली कमाई करून घेतली.
वाहतूक सुरळीत; द्वारकाला कोंडी
दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी मुख्य रस्त्यांसह बाजारपेठांमध्ये आणि गोल्फ क्लबवरील गणेशमूर्ती स्टॉलवरदेखील गर्दीचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी होते. त्यामुळे यंदा वाहतुकीची कोंडी किंवा वाहतूक कोलमडून पडण्याचे प्रकार फारसे घडले नाहीत. मात्र नाशिक-पुणेरोडवरील द्वारकाजवळ असलेल्या गणेश मूर्ती स्टॉलसवर मोठी गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती.
नाशिकरोड परिसरात सकाळपासून गणेशोत्सवाचा उत्साह दिसून आला. बिटको चौकातील स्टॉल्सवर मूर्ती घेण्यासाठी सार्वजनिक मंडळे तसेच कुटुंबीयांनी गर्दी केली होती. काही मंडळांनी ढोलताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत गणरायाचा जयजयकार करत मिरवणूक काढून श्री गणरायाची स्थापना केली.

Web Title:  Ganpati came to the doorstep!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.