कारागृहातील कैद्याकडे आढळला गांजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 01:24 IST2019-06-14T01:23:29+5:302019-06-14T01:24:21+5:30

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैद्याकडे गांजा आढळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The ganja found in the jail prisoner | कारागृहातील कैद्याकडे आढळला गांजा

कारागृहातील कैद्याकडे आढळला गांजा

नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैद्याकडे गांजा आढळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुरुंग अधिकारी ज्ञानेश्वर गोरख चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, न्यायालयीन कैदी सुनील विलास चांगले रा. हनुमानवाडी, मोरे मळा पंचवटी याच्या अंग झडतीमध्ये खाकी रंगाच्या तंबाखूच्या पुडीत चिकट टेपमध्ये गुंडाळून आणलेला दीडशे रुपयांचा ३० ग्रॅम वजनाचा ओला गांजा आडळून आला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवळाली कॅम्पला चंदनाच्या झाडाची चोरी
नाशिकरोड : देवळाली कॅम्प आनंदरोड येथील उमराव विहार आवारातील दोन चंदनाची झाडे कटरने कापून चोरून नेली. उमराव विहार येथील लखविंदरसिंग गुरूचरणसिंग यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अज्ञात चंदन चोरट्यांनी कटरच्या साह्याने बंगल्याच्या आवारातील २१ हजार रुपये किमतीची दोन चंदनाची झाडे कापून चोरून नेली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The ganja found in the jail prisoner