शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

नाशिकमधून वाळूच्या गाड्या पळवून नेणा-यांविरूद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 5:35 PM

शासनाच्या महसुल वसुलीसाठी बेकायदेशीर गौण खनिजाची वाहतूक करणा-यांविरूद्ध महसुल प्रशासनाने मोहिम हाती घेतली असून, तलाठी, मंडळ अधिका-यांचे पथके गठीत करण्यात आली आहेत. नाशिक शहरात पर जिल्ह्यातून चोरी, छुपी मार्गाने येणा-या वाळू वाहतुक करणा-या गाड्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर पाच पट दंडात्मक कारावाई केली

ठळक मुद्देप्रशासन सतर्क : बाहेर पडणा-या वाहनांची तपासणी तीन गाड्या दंड न भरताच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून परस्पर पळवून नेल्या

नाशिक : महसूल अधिका-यांच्या पथकाने बेकायदा वाळू वाहतूक करणा-या पकडून आणलेल्या तीन गाड्या दंड न भरताच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून परस्पर पळवून नेल्या प्रकरणी अखेर नाशिक तहसिल कार्यालयाने चौघा वाळू माफियांविरूद्ध सरकारवाडा पोलिसात तक्रार दिली आहे. शासकीय जागेतून परस्पर वाहन पळविल्याच्या प्रकारामुळे प्रशासन सतर्क झाले असून, यापुढे कार्यालयातून बाहेर पडणा-या गौणखनिजाच्या गाडी चालकाकडे दंड भरल्याची पावती पाहिल्याशिवाय गाडी बाहेर पडू न देण्याचा निर्णय घेतला आहे.शासनाच्या महसुल वसुलीसाठी बेकायदेशीर गौण खनिजाची वाहतूक करणा-यांविरूद्ध महसुल प्रशासनाने मोहिम हाती घेतली असून, तलाठी, मंडळ अधिका-यांचे पथके गठीत करण्यात आली आहेत. नाशिक शहरात पर जिल्ह्यातून चोरी, छुपी मार्गाने येणा-या वाळू वाहतुक करणा-या गाड्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर पाच पट दंडात्मक कारावाई केली जात आहे. गेल्या सोमवारी तलाठी व मंडळ अधिका-यांनी पकडून आणलेल्या तीन मालट्रक (क्रमांक एम. एच. ०४ एफक्यु ४०८२ व एम. एच. ०४ एफडी ८७०३; एम. एम. १५ डी. के. ६३३१) नाशिक तहसिलदार कार्यालयाच्या बाहेर उभ्या केल्या असता दोन दिवसांनी दोन्ही मालट्रक आवारातून गायब झाल्याचे उघडकीस आले. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच त्याची दखल घेत शनिवारी अखेर नाशिक तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदार अरूण शेवाळे यांनी सरकारवाडा पोलिसात तक्रार दिली आहे. सुमारे सव्वा सहा लाख रूपये किंमतीच्या तीन मालट्रक अंबादास भागवत सदगिर रा. शिंदे, सुरेश चंदर भोईर, दत्ता मुरलीधर माने, भरत मोतीराम नवले रा. सारूळ ता. नाशिक या चौघांनी पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. वाळू माफियांच्या या अभिनव दादागिरीची दखल घेत प्रशासनाने आता आणखी कडक भुमिका घेण्याचा निर्णय घेतला असून, एकदा पकडून आणलेली गाडी तहसिल कार्यालयाच्या अवारात आणून उभी केल्यानंतर ज्या वेळी ती कार्यालयातून बाहेर पडेल त्यावेळी गाडी चालकाकडून दंड भरल्याची पावती तपासूनच गाड्या सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक