जनशांतिधाम येथे गणेश जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:26 IST2019-02-10T22:51:18+5:302019-02-11T00:26:52+5:30
जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने ओझर येथे साकारण्यात आलेल्या जनशांतिधामात वेद पाठशाळेतील वैदिक विद्यार्थ्यांच्या आणि ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात आश्रमातील महागणेशमूर्तीस महाभिषेक करण्यात आला.

जनशांतिधाम येथे गणेश जयंती
ओझर टाउनशिप : जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने ओझर येथे साकारण्यात आलेल्या जनशांतिधामात वेद पाठशाळेतील वैदिक विद्यार्थ्यांच्या आणि ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात आश्रमातील महागणेशमूर्तीस महाभिषेक करण्यात आला. याबरोबरच आश्रमात स्थापन करण्यात आलेल्या अष्टविनायकांचे विधिवत पूजन करण्यात आले.
स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या प्रेरणेने ओझर येथील जनशांतिधाम येथे आश्रमातील वेद पाठशाळेतील वैदिक विद्यार्थी व ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात महाभिषेक करण्यात आला. येथील विठ्ठल वानले यांच्या हस्ते महागणेश आणि बाणेश्वर महादेव महाभिषेक पूजन पार पडले. याप्रसंगी स्वामी परमेश्वरानंद महाराज, हृदयानंद माउली उपस्थित होते.