गांडोळे जि. प. शाळेत गाडगेबाबांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 00:47 IST2021-02-23T22:03:42+5:302021-02-24T00:47:56+5:30
ननाशी : दिंडोरी तालुक्यातील गांडोळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जि. प. सदस्य अशोक टोंगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती साजरी करण्यात आली.

गांडोळे जि. प. शाळेत संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त अभिवादन करताना जि. प. सदस्य अशोक टोंगारे. समवेत गांडोळे सरपंच, उपसरपंच, शिक्षक आदी.
ननाशी : दिंडोरी तालुक्यातील गांडोळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जि. प. सदस्य अशोक टोंगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी संत गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शालेय परिसर व गावातील प्रमुख रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. ग्रामस्थांना कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मास्क वापरण्याचे व वेळो वेळी हात स्वच्छ करण्याचे आवाहन शिक्षकांच्या वतीने करण्यात आले. जि. प. सदस्य अशोक टोंगारे यांच्या निधीतून शाळेच्या परिसरात पेवरब्लॉक बसविण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला.
या कामाचा शुभारंभ करण्यात आला. प्रल्हाद पवार यांनी गाडगे महाराजांच्या कार्याबद्दल उपस्थिताना माहिती दिली. कार्यक्रमास ननाशीचे सरपंच दत्ता शिंगाडे, सावरपाडाचे सरपंच पुंडलीक महाले, इवदचे अभियंता बावीस्कर, गांडोळेचे नवनिर्वाचित सरपंच भरत भोये, उपसरपंच शकुंतला भोये, ज्येष्ठ नेते सुरेश भोये, ननाशीचे सरपंच दत्ता शिंगाडे , केंद्रप्रमुख नामदेव गायकवाड, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष धनराज भोये, पोलीसपाटील हर्षदा भोये आदी उपस्थित होते.