सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2022 01:13 IST2022-01-29T01:13:09+5:302022-01-29T01:13:26+5:30

चांदवड तालुक्यातील राहुड येथे मळ्यात दोन जणांनी भांडी व दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने दोन सोन्याच्या पोती किंमत रुपये दीड लाखाची चोरी करून दुचाकीवरून पसार झाले.

Ganda under the pretext of polishing gold ornaments | सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने गंडा

सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने गंडा

चांदवड : तालुक्यातील राहुड येथे मळ्यात दोन जणांनी भांडी व दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने दोन सोन्याच्या पोती किंमत रुपये दीड लाखाची चोरी करून दुचाकीवरून पसार झाले. यााबाबत विठ्ठल सखाराम पवार (रा. राहुड) यांनी चांदवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. दि. २७ जानेवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास राहुड येथील मळ्यात दोन अज्ञात इसम अंदाजे ३० ते ३५ वयोगटांतील दोनजण दुचाकीवर आले. त्यांनी दागिने पॉलिश करून देतो, असे सांगून मणीमंगळसूत्र तीन तोळे वजनाचे ९९ हजार रुपये व सोन्याची पोत अंदाजे वजन दोन तोळे किमती रुपये साठ हजार असा एकूण दीड लाखाचा ऐवज लंपास केल्याची फिर्याद विठ्ठल पवार यांनी दिली. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव तपास करीत आहेत.

Web Title: Ganda under the pretext of polishing gold ornaments