लॉकडाऊनमध्ये चार कोटींना ‘गंडा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 00:16 IST2020-08-11T22:54:17+5:302020-08-12T00:16:09+5:30
नाशिक : लॉकडाऊन काळात नाशिककरांनी सुमारे चार कोटी सहा लाख ९२ हजार रुपये इतकी मोठी रक्कम आॅनलाइन फसवणुकीत गमावली आहे. सायबर गुन्हेगारांनी विविध क्लृप्त्या लढवत विविध आमिष दाखवून बनावट पद्धतीने गुगल पे, फोन पे कोड स्कॅनिंगद्वारे तसेच परस्पर बँक खात्याचा अॅक्सेस मिळवून सुमारे १६ ते १७ घटनांमध्ये नागरिकांना हजारो ते लाखो रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. सर्वाधिक दहा घटना मार्चमध्ये घडल्याची नोंद सायबर पोलीस ठाण्यात आहे.

लॉकडाऊनमध्ये चार कोटींना ‘गंडा’
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : लॉकडाऊन काळात नाशिककरांनी सुमारे चार कोटी सहा लाख ९२ हजार रुपये इतकी मोठी रक्कम आॅनलाइन फसवणुकीत गमावली आहे. सायबर गुन्हेगारांनी विविध क्लृप्त्या लढवत विविध आमिष दाखवून बनावट पद्धतीने गुगल पे, फोन पे कोड स्कॅनिंगद्वारे तसेच परस्पर बँक खात्याचा अॅक्सेस मिळवून सुमारे १६ ते १७ घटनांमध्ये नागरिकांना हजारो ते लाखो रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. सर्वाधिक दहा घटना मार्चमध्ये घडल्याची नोंद सायबर पोलीस ठाण्यात आहे.
लॉकडाऊन काळात शहरात ३ मार्चपासून सातत्याने एकापाठोपाठ सायबर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. एका गुन्ह्यात अनोळखी सायबर गुन्हेगाराने चक्क एका महिलेला अश्लील फोटो पाठवून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत सुमारे २६ हजार रुपये उकळल्याचाही धक्कादायक प्रकार ७ मार्च रोजी उघडकीस आला होता.
अंबड पोलीस ठाण्यात २४ मार्च रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात फिर्यादीची तब्बल ११ लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक सायबर गुन्हेगाराकडून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. काही गुन्ह्यांमध्ये परराज्यातील गुन्हेगारांनी शहरातील नागरिकांच्या बॅँक खात्यातून परस्पर पैसे काढल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. आॅनलाइन बॅँकिंगचा वापर हा सतर्कतेने करायला हवा. आॅनलाइन आर्थिक फसवणुकीचा आकडा वाढत आहे. नागरिकांनी सावध होणे गरजेचे आहे. झारखंड, राजस्थान, बिहार या तीन राज्यांमधून सध्या सायबर चोरट्यांनी नाशिककडे लक्ष केंद्रित केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.
- देवराज बोरसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणेमागील वर्षी साडेसातशे नाशिककरांची सायबर चोरट्यांनी आर्थिक फसवणूक करत कोट्यवधींची रक्कम लुटली होती. यावर्षी हा आकडा अधिकच गंभीर होण्याची चिन्हे आहे. या सहा महिन्यांमध्ये सुमारे चारशे नागरिकांना आर्थिक फसवणुकीचा सामना करावा लागल्याचे सायबर पोलीस सांगतात.लॉकडाऊनच्या काळातही सायबर क्राइम घटनांमध्ये वाढ झाली होती.