अंबड येथे गजानन महाराज प्रगटदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:30 IST2019-02-26T23:26:13+5:302019-02-27T00:30:01+5:30

श्री गजानन महाराज भक्तमंडळ मुरारीनगर अंबड यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी ही गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

Gajananan Maharaj Prakash Din at Ambad | अंबड येथे गजानन महाराज प्रगटदिन

अंबड येथे गजानन महाराज प्रगटदिन

सिडको : श्री गजानन महाराज भक्तमंडळ मुरारीनगर अंबड यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी ही गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे प्रथम गजानन महाराज भक्त मंडळाचे अध्यक्ष अमोल शेळके व भाग्यश्री शेळके यांनी मुरारीनगर येथील पालखी तळावर गजानन महाराजांच्या मूर्तीला सप्तनिक अभिषेक केला.
सावतानगर येथील इच्छामणी गणपती मंदिरात गजानन महाराज प्रकटदिन सोहळ्याचा चित्रमय प्रसंग साकारण्यात आला . यावेळी जगताप यांनी गजानन विजय या ग्रंथाच्या अध्यायाचे वाचन केले. यावेळी जमलेल्या भक्तांनी गजानन महाराज की जय म्हणत दर्शनासाठी गर्दी केली. यावेळी शेगाव येथून आलेल्या भजनी मंडळाने गण गण गणांत बोते या सह चला शेंगावाला जाऊ, गाडी घुंगराची निघाली शेंगावाला अशी अनेक महाप्रसादाचे देण्यात आले. दुपारी सावतानगर येथून श्री गजानन महाराजांच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीच्या मार्गावर पाण्याचे फवारे मारण्यात आले होते सर्व पालखी मार्ग स्वच्छ करण्यात आला होता पालखी मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात येत होत्या सर्वत्र भगवे ध्वज लावल्यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. संध्याकाळी पालखीचे डीजीपीनगर येथील माउली लॉन्स चौकात फटाक्यांच्या आतषबाजीत सर्व पक्षीय व विविध संस्था व मंडळांच्या वतीने स्वागत करण्यात आले.

Web Title: Gajananan Maharaj Prakash Din at Ambad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.