Gajaad who abuses young women by making friends through 'dating app' | 'डेटिंग ॲप'द्वारे मैत्री करत युवतींवर अत्याचार करणारा गजाआड;मुरबाडमधून आवळल्या मुसक्या

'डेटिंग ॲप'द्वारे मैत्री करत युवतींवर अत्याचार करणारा गजाआड;मुरबाडमधून आवळल्या मुसक्या

ठळक मुद्दे साताऱ्यासह ठाण्यातही बलात्काराचा गुन्हा 

इंदिरानगर : सोशलमिडियाच्या माध्यमातून विविधप्रकारच्या ह्यडेटिंग ॲपह्णद्वारे संवाद साधून विवाहित महिला व युवतींसोबत मैत्री करत त्यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा बनाव करत लग्नाचे आमीष दाखवून लैंगिक शोषण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मुरबाडमधून इंदिरानगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याविरुध्द सातारा, ठाणे जिल्ह्यात यापुर्वी बलात्कार, विनयभंगाचे गुन्हे दाखल असल्याचे प्रथमदर्शनी पुढे आले आहे.

‌इंदिरानगर परिसरातून दोन महिन्यांपुर्वी एक युवती बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आई-वडिलांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिली होती. तेव्हापासून पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली या बेपत्ता मुलीचा शोध घेतला जात होता. युवतीचा शेअर चॅट ॲपलिकेशनद्वारे‌ एका व्यक्तीशी संपर्क झाल्याचे तपासात पुढे आले.

संशयित वैभव लक्ष्मण पाटील (रा.मुरळी, ता.पाटण, जि.सातारा) याच्यासोबत घरातून डिसेंबर महिन्यात गेल्याची माहिती समजली. सातत्याने पाटील याच्या मागावर इंदिरानगरमधील पोलिसांचे पथक होते; मात्र कोठूनही त्याचा सुगावा लागू शकत नव्हता. मुरबाड, ठाणे, सातारा, महाड या शहरांमध्ये पोलीस त्याचा शोध घेत होते. मुरबाडमधील एका खबऱ्याकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्याअधारे पथकाने तेथे सापळा रचला. उपनिरीक्षक प्रवीण बाकले, सुहासिनी बारेला, जावेद खान आदिंनी संशयित पाटील यास शिताफीने अटक केली. तसेचच त्याच्या तावडीतून बेपत्ता मुलीची सुखरुपपणे सुटकाही केली. त्याच्याविरुध्द यापुर्वी ठाणे जिल्ह्यातील रबाडा पोलीस ठाण्यासह साताऱ्यात बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, पाटीलविरुध्द इंदिरानगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने येत्या शनिवारपर्यंत (दि.२०) पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास बारेला या करीत आहेत.


...असा केला विश्वास संपादन
पिडित मुलीशी चॅटिंग करत तिचा मोबाईल क्रमांक मिळवून तिच्याशी मैत्री करत नंतर प्रेमसंबंध असल्याचे सांगून आपण कोर्टात जाऊन लग्न करु यवुतीला पाथर्डीफाटा येथुन झायलो कारमध्ये (एमएच१४ सीएक्स २५९५) या वाहनात बवसुन तिचा मोबाईल ताब्यात घेत तो बंद करत बळजबरीने थेट मुरबाडला घेऊन गेला. विवाहच्या नावाखाली त्याने पिडितेकडील दीड तोळ्याचे दागिने काढून घेत बनावट नोटरी केल्याचे कागदपत्रे दाखवून फसवणुक तर तिच्या इच्छेविरुध्द सलग काही दिवस शारिरिक संबंध प्रस्थापित करत लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात पुढे आले आहे.
---

 

Web Title: Gajaad who abuses young women by making friends through 'dating app'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.