कवडदरा विद्यालयात गाडगे महाराज जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 18:55 IST2021-02-24T18:55:36+5:302021-02-24T18:55:36+5:30
कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील भारत सर्व सेवा संघाचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

कवडदरा विद्यालयात गाडगे महाराज जयंती
कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील भारत सर्व सेवा संघाचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी प्राचार्य कचेश्वर मोरे यांनी प्रतिमेचे हार घालून पूजन केले. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला जयघोष करण्यात आला. तसेच शालेय परिसर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक जे. ए. नायकवडी, बी. एस. पवार, जी. जे. जाधव, एन. एस. पवार, एस. एस. लोहार, एस. जी. पवार, ए. ए. म्हस्के, पी. एन. कदम, व्ही. एन. भांगे, एम. व्ही. कोरडे, पी. ई. परदेशी, के. ए. मुल्ला, एस. बी. बांबळे, एस. एस. जाधव, के. एस. पवार, एम. ए. राजपूत, एन. बी. वाकचौरे, एन. बी. गायकवाड तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
(२४ कवडदरा १)
गाडगे महाराज जयंती साजरी करताना सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी.