शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

पोलीस अकादमीतील भावी ‘पीएसआय’ ‘सैराट’; ‘ग्रुप डान्स सेलिब्रेशन’ची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 2:15 AM

महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाऱ्यांकरिता बक्षीस वितरण सोहळा शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता.

नाशिक : कोरोनाचा विळखा घट्ट होत असताना महाराष्ट्र पोलीस अकादमीचे प्रशिक्षणार्थी भावी पोलीस उपनिरीक्षकांनी (पीएसएआय) ‘सैराट’ गाण्यावर एकत्र येत येथील सभागृहात ग्रुप डान्स करत नियम सर्रासपणे पायदळी तुडविले. भावी पोलीस अधिकाऱ्यांचा समूहनृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियातून शनिवारी चांगलाच व्हायरल झाल्याने संताप व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाऱ्यांकरिता बक्षीस वितरण सोहळा शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. त्यात प्रशिक्षणार्थी पोलिसांचे कोरोना प्रतिबंधक लसीच्या दुसऱ्या डोसचेही लसीकरण पूर्ण केल्याचा दावा अकादमीच्या सूत्रांनी केला. नाचताना कोणीही मास्क लावलेला नव्हता. 

डान्सचा व्हिडिओ व्हायरल : भावी पीएसआय दर्जाच्या अधिकाऱ्यांनी अतिउत्साही होत बेभानपणे एकत्र येत पोलीस अकदामीच्या सभागृहात ब्लेझर सूट परिधान करत जोरदार ‘डान्स’ केला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियामधून शनिवारी सकाळी व्हायरल झाला. दिवसभर सोशल मीडियामध्ये या व्हिडिओची चर्चा रंगल्यानंतर संध्याकाळी अकादमीकडून खुलासा करण्यात आला.

विभागीय स्तरावर चौकशी करणारबक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीवरून सांस्कृतिक कार्यक्रमाची परवानगी देण्यात आली होती. या संपूर्ण कार्यक्रमात कोविड लसीच्या दुसरा डोस घेतलेल्या अधिकाऱ्यांनाच परवानगी देण्यात आलेली होती. बक्षीस वितरण समारोपानंतर वरिष्ठ अधिकारी परतल्यानंतर भावी पोलिसांनी एकत्र येत गर्दी केली आणि नृत्य केले. हे वर्तन अशोभनीय व चुकीचे असून याची विभागीय स्तरावर चौकशी केली जाईल, असे अकादमीच्या संचालक अश्वती दोर्जे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या