वीरजवानावर आज अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 01:36 IST2020-06-26T23:06:10+5:302020-06-27T01:36:22+5:30

साकोरी झाप गावातील मराठी शाळेजवळ वीरजवान सचिनच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. पुणे येथे त्याचे ‘पार्थिव’ आणले जाणार असून, त्यानंतर नाशिकमार्गे शनिवारी सकाळी १० पर्यंत त्यांच्या निवासस्थानी पार्थिव आणले जाईल. त्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील, असे तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी सांगितले.

Funeral today at Veerajwana | वीरजवानावर आज अंत्यसंस्कार

मोरे वस्तीवर मराठी शाळेच्या मैदानात वीरजवान सचिन मोरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तयार करण्यात येत असलेला चबुतरा.

मालेगाव : साकोरी झाप गावातील मराठी शाळेजवळ वीरजवान सचिनच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. पुणे येथे त्याचे ‘पार्थिव’ आणले जाणार असून, त्यानंतर नाशिकमार्गे शनिवारी सकाळी १० पर्यंत त्यांच्या निवासस्थानी पार्थिव आणले जाईल. त्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील, असे तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी सांगितले.
नंदू मोरे, अनिल मोरे, संतोष मोरे, भास्कर मोरे यांच्यावर अंत्यसंस्कारासाठी जबाबदारी गावाने सोपवली आहे. मराठी शाळेजवळ मुरूम टाकण्यात आला, ओटा बांधण्याचे काम सुरू आहे. पार्थिव सजविलेल्या ट्रॅक्टरमध्ये ठेवून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. त्यासाठी साकुरी ग्रामपंचायत आर्थिक मदत करीत आहे. आज दिवसभर वीरजवान सचिन मोरे यांच्या निवासस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक नरेंद्र भदाणे, तहसीलदार चंद्रजित राजपूत, तलाठी अहिरराव यांंनी भेट देऊन विक्रम मोरे यांचे सांत्वन केले.

Web Title: Funeral today at Veerajwana