Funeral at Jawan Arjun Valanj | जवान अर्जुन वाळुंजवर अंत्यसंस्कार
चांदवड तालुक्यातील भरवीर येथील जवान अर्जुन वाळुंज यांची भरवीर गावातून निघालेली अंत्ययात्रा.

ठळक मुद्देभरवीर : प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वाहिली पुष्पांजली

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदवड : तालुक्यातील भरवीर येथील सैन्य दलातील जवान अर्जुन प्रभाकर वाळुंज (२८) याचे निधन झाले. अर्जुन याचे पार्थिव सैन्य दलाच्या नियमानुसार मूळ गावी भरवीर, तालुका चांदवड येथे मंगळवारी (दि. २२) सकाळी ९ वाजेच्या सुमारास आणण्यात आले. शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले, तर भरवीर गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली.
अंत्ययात्रेस पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. वीर जवान तुझे सलाम अशी मोठी रांगोळी काढली होती. जड अंत:करणाने या जवानाला
निरोप देण्यात आला. भरवीर येथील त्यांच्या शेताजवळच अंत्यविधी करण्यात आला. आई राजूबाई, वडील प्रभाकर, पत्नी पूनम अर्जुन वाळुंज, लहान भाऊ सागर, विवाहित बहीण योगीता सुदर्शन जाधव यांनी जड अंत:करणाने त्याचे शेवटचे दर्शन घेतले. यावेळी पत्नी पूनम बेशुद्ध झाल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले. यावेळी प्रशासनाच्या वतीने उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी पुष्पचक्र वाहिले.
यावेळी मनमाड विभागाचे उपअधीक्षक साळवे, चांदवड पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील, सैन्य दलातील अधिकारी, सैनिक, पोलीस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आमदार डॉ. राहुल आहेर, प्रहार संघटनेचे गणेश निंबाळकर, कॉँग्रेसच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव वक्टे, शांताराम ठाकरे, नितीन आहेर, का.भा. आहेर, भूषण कासलीवाल, राहुल शिरीषकुमार कोतवाल, सुनील अहेर, विलास ढोमसे, विजय जाधव, मुख्याध्यापक दादा अहिरे, नवनाथ आहेर यांची भाषणे झालीत. अशोक भोसले यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी चांदवड तालुक्यातील नातलग, सैनिक, राजकीय क्षेत्रातील नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.


Web Title: Funeral at Jawan Arjun Valanj
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.