ओझरला श्रीराम मंदिरासाठी निधी संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 12:38 PM2021-02-04T12:38:35+5:302021-02-04T12:39:55+5:30

ओझर : संपुर्ण भारतभर श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्र मंदीर अयोध्या निधी समर्पण अभियान सुरू आहे.

Fundraising for Ojharla Shriram Temple | ओझरला श्रीराम मंदिरासाठी निधी संकलन

ओझरला श्रीराम मंदिरासाठी निधी संकलन

Next

ओझर : संपुर्ण भारतभर श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्र मंदीर अयोध्या निधी समर्पण अभियान सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर निफाड तालुक्याचे माजी आमदार अनिल कदम यांनी श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी १ लाख ११ हजार १११ रुपये किंमतीचा धनादेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह कृष्णाजी घरोटे यांच्याकडे सुपूर्द केला. ओझर येथील राम मंदिरात राम भक्त व नागरिकांच्या उपस्थितीत अनिल कदम यांनी श्री गणेशाची आरती व श्रीरामाचे पुजन केले. या रक्कमेतील ११ हजार रुपये ओझरचे ज्येष्ठ शिवसैनिक दिवंगत प्रशांत(भैया) शिंदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिले असल्याची माहिती कदम यांनी यावेळी दिली. या प्रसंगी तालुका कार्यवाह सागर साळुंखे, गणेश मोरे , गणेश खोडे,आर. टी. कदम, सुधीर राजगुरू, दिलीप काळे ,माजी पं. स.सभापती दिलीप लढ्ढा ,शिवसेना उपतालुकाप्रमुख प्रकाश महाले, कामेश शिंदे , नितीन काळे, शरद शेजवळ , सदस्य संजय पगार, प्रशांत पगार, आशिष शिंदे, मंगेश काळे,सुरेश कदम, होनाजी शिंदे, ओम शिंदे, नंदू पगार, भाऊसाहेब कदम, सुनील चौधरी, रमेश शेळके यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Web Title: Fundraising for Ojharla Shriram Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक