चांदवड-विंचूर रस्त्यासाठी निधी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:43 IST2018-02-15T00:41:20+5:302018-02-15T00:43:43+5:30
नाशिक : शासनच्या हायब्रिड अन्यूईटी योजनेअंतर्गत चांदवड-लासलगाव-विंचूर रस्त्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. सध्या आॅर्थररोड कारागृहात असलेल्या छगन भुजबळ यांनी आपल्या मतदारसंघातील प्रश्नांसाठी कारागृहातूनच सरकारशी पत्रव्यवहार करून लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या मागण्यांना सरकारनेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

चांदवड-विंचूर रस्त्यासाठी निधी द्या
नाशिक : शासनच्या हायब्रिड अन्यूईटी योजनेअंतर्गत चांदवड-लासलगाव-विंचूर रस्त्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
सध्या आॅर्थररोड कारागृहात असलेल्या छगन भुजबळ यांनी आपल्या मतदारसंघातील प्रश्नांसाठी कारागृहातूनच सरकारशी पत्रव्यवहार करून लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या मागण्यांना सरकारनेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिलेल्या पत्रात भुजबळ यांनी म्हटले आहे की, चांदवड-लासलगाव-विंचूर हा २५ किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी विंचूर येथे रास्ता रोको आंदोलने व निदर्शने करण्यात आलेली आहेत. शासनाच्या हायब्रिड अॅन्यूईटी योजनेतून या रस्त्याचे काम करण्याची त्यांनी शासनाकडे पत्राद्वारे मागणी केलेली आहे.
यापूर्वीही भुजबळ यांनी दि. २२ जानेवारी २०१८ व १७ नोव्हेंबर २०१७ रोजी शासनाच्या हायब्रिड अॅन्यूईटी योजनेत या कामाचा समावेश करून हे काम अर्थसंकल्पात समाविष्ट करण्याची मागणी चंद्रकांत पाटील यांच्याकडे केलेली आहे.
शासनाच्या या प्रकल्पांतर्गत करण्यात येणाºया रस्त्यांसाठी राज्य शासनाकडून ४० टक्के, तर विकासकाकडून ६० टक्के रक्कम खर्च करून सदर रस्त्यांची कामे पूर्ण केली जातात.
या रस्त्याची पुढील पंधरा वर्षांकरिता निगा राखण्याची जबाबदारी विकासकावरच असते. त्या मोबदल्यात राज्य शासन विकासकाला पुढील पंधरा वर्षांत उर्वरित ६० टक्के रक्कम व्याजासह टप्प्याटप्प्याने देत असते. त्यामुळे हायब्रिड अन्यूईटी प्रकल्पामध्ये या रस्त्याचा समावेश झाल्यास सदर रस्त्याची पुढील १५ वर्षांपर्यंत योग्य निगा राखली जाणार आहे. याचा फायदा नागरिकांना होणार असून, पुढील १५ वर्षे या रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न मिटणार आहे.चांदवड-लासलगाव-विंचूर हा २५ किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे.
हायब्रिड अन्यूईटी प्रकल्पामध्ये या रस्त्याचा समावेश झाल्यास सदर रस्त्याची पुढील १५ वर्षांपर्यंत योग्य निगा राखली जाणार आहे.