शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

कर कपातीनंतरही इंधनदरवाढ सुरुच ; नाशकात पेट्रोल ८७.६० तर डिझेल ७६.०२ रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 16:13 IST

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साइज ड्युटी अडीच रुपयांनी कपात केल्यानंतर, आता राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारनेही पेट्रोलच्या दरात अडीच रुपयांची कपात केली असून डिझेलमध्ये दीड रुपयांची कपात करण्यात आली आहे. परंतु,रिव्हाइज रिटेल फ्यूल प्राइस सिस्टिममुळे शनिवारी (दि.६) पुन्हा पेट्रोल आणि डिझेच्या किंमती वाढल्या असून रोज वाढणाऱ्या इंधनांच्या दरापुढे केंद्र व राज्य सरकारचा करकपातीचा प्रयत्नही थिटा पडला आहे.  

ठळक मुद्देकर कपातीनंतर इंधनााची दरवाढ नाशिकमध्ये पेट्रोल ८७.६० तर डिझेल ७६.०२ रुपयेदरवाढीमुळे करकपातीचा अत्यल्प फायदा

नाशिक : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साइज ड्युटी अडीच रुपयांनी कपात केल्यानंतर, आता राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारनेही पेट्रोलच्या दरात अडीच रुपयांची कपात केली असून डिझेलमध्ये दीड रुपयांची कपात करण्यात आली आहे. परंतु,रिव्हाइज रिटेल फ्यूल प्राइस सिस्टिममुळे शनिवारी (दि.६) पुन्हा पेट्रोल आणि डिझेच्या किंमती वाढल्या असून रोज वाढणाऱ्या इंधनांच्या दरापुढे केंद्र व राज्य सरकारचा करकपातीचा प्रयत्नही थिटा पडला आहे.  केंद्र सरकारने गेल्यावर्षी १६ जून २०१७ पासून डायनॅमिक फ्यूल प्राइसिंगच्या माध्यमातून प्रतिदिन रिव्हाइज रिटेल फ्यूल प्राइस सिस्टिमची सुरु वात केल्यानंतर पेट्रोल डिझेलच्या किमतीत रोजच्या रोज होणाऱ्या बदलांमुळे इंधनाच्या दरात हळूहळू वाढ होऊन पेट्रोलचे दर ९१.७९ रुपयांपर्यंत तर डिझेलचे दर ७९.३१ रुपयांपर्यंत पोहोचले होते. त्यात केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साइज ड्युटी अडीच रुपयांनी कपात केल्यानंतर, राज्य सरकारनेही पेट्रोलच्या दरात अडीच रुपयांची कपात केली असून डिझेलमध्ये दीड रुपयांची कपात केली आहे. परंतु, शनिवारी पेट्रोल १८ पैशांनी महागले असून डिझेल ६९ पैशांनी महागलल्याने सरकारचे कर कपात करून इंधनाचे दर नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न थिटे पडले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये इंधन दरवाढीविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून केंद्र सरकाने रिव्हाइज रिटेल फ्यूल प्राइस सिस्टिममध्येच कायमस्वरुपी बदल करण्यासोबतच पेट्रोल व डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी सर्वसामान्य नाशिककरांकडून होत आहे.

दरवाढीमुळे करकपातीचा अत्यल्प फायदा सरकारने केलेल्या करकपातीनंतर शुक्रवारी पेट्रोल ८७.४२ रुपये तर डिझेल ७६.७० रुपये असलेल्या दरांमध्ये शनिवारी पुन्हा वाढ होऊन पेट्रोल ८७.६० तर  डिझेल ७६.०२ रुपयांनी विकले गेले. या दरवाढीमुळे राज्य सरकारने करामध्ये दीड रुपया कपात करूनही नाशिकरांना शनिवारी डिझेलच्या दरात केवळ ६८ पैसे दर कपातीचा फायदा मिळाला. त्यामुळे एककडे सरकार इंधनाचे दर नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करीत असले तरी दुसरीकडे रिव्हाइज रिटेल फ्यूल प्राइस सिस्टिमुळे दरवाढ सुरूच असल्याने ग्राहकांना करकपातीचा अत्यल्प फायदा मिळत असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :Petrolपेट्रोलNashikनाशिकTaxकरDieselडिझेलconsumerग्राहक