संथारा व्रताच्या समर्थनार्थ उद्या मोर्चा
By Admin | Updated: August 23, 2015 00:05 IST2015-08-23T00:05:25+5:302015-08-23T00:05:52+5:30
संथारा व्रताच्या समर्थनार्थ उद्या मोर्चा

संथारा व्रताच्या समर्थनार्थ उद्या मोर्चा
नाशिक : सकल जैन समाजाच्या वतीने संथारा व्रताच्या समर्थनार्थ जेएसजी प्लॅटिनम, एच.एल.ग्रुप आणि जैन कॉन्फरन्सतर्फे सोमवारी सकाळी १० वाजता रविवार कारंजावरील जैन स्थानकापासून मूकमोर्चा काढण्यात येणार आहे.
मोर्चा रविवार कारंजामार्गे शालिमार, सीबीएस हुतात्मा स्मारक येथे गेल्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. सर्व समाजबांधव तोंडावर पट्टी बांधून तसेच मौन बाळगून या मोर्चात सहभागी होणार आहेत. समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन हरिष लोढा, कल्पना पाटणी यांनी केले आहे.
या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी टिळकवाडीतील जैन बौर्डिंग येथे रविवारी (दि. २३) सकाळी १० वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)