शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
7
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
8
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
9
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
10
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
11
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
12
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
13
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
14
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
15
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
16
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
17
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
18
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
20
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक संघटनेचा तहसील कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: September 3, 2016 23:12 IST

देशव्यापी संप : संस्थाचालकांसह पालकही सहभागी झाल्याचा दावा

 सिन्नर : तालुक्यातील शिक्षक व शिक्षणाच्या प्रश्नासाठी मोठ्या संख्येने शिक्षकांसह संस्थाचालक व पालकही सहभागी झाल्याचा दावा शिक्षक संघटनेने केला आहे. हुतात्मा स्मारकापासून कामगार संघटना व शिक्षक संघटना यांनी एकत्र येऊन तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे विद्यासचिव एस. बी. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक संघटनेने तहसील कार्यालयासमोर सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत धरणे आंदोलन केले. २८ आॅगस्टचा जाचक शासन निर्णय रद्द करावा, अतिरिक्त ठरलेले शिक्षक कर्मचाऱ्यांचे १०० टक्के समायोजन होईपर्यंत मूळ आस्थापनेवरून वेतन सुरू ठेवण्यात यावे, अंशदायी पेन्शन योजना त्वरित बंद करून जुनी पेन्शन योजना सरसकट लागू करावी आदिंसह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. या मागण्या मान्य न झाल्यास संस्थाचालक संघटना, मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ, शिक्षक-शिक्षकेतर संघटना यांच्या आदेशान्वये कायम शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. शिक्षणाचे बाजारीकरण थांबवा, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे विद्यासचिव एस. बी. देशमुख, टी.डी.एफ.चे तालुकाध्यक्ष पी. डी. विंचू, विद्या साळुंखे, बी. व्ही. पांडे, दत्तात्रय आदिक, यू. बी. आव्हाड, कैलास काळे, आर. व्ही. भगत, एम. एन. देशमुख, एम. डी. काळे, राजेंद्र मिठे यांच्यासह शेकडो शिक्षक सहभागी झाले होते. (वार्ताहर)