शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

समाजात हवे मैत्रीपूर्ण वातावरण : संतोष गटकळ

By admin | Updated: March 18, 2017 20:45 IST

समाजातील विविध घटकांमध्ये मैत्री व सद्भावनेचे वातावरण निर्माण झाल्यास कायद्याची गरज भासणार नाही

नाशिक : समाजातील विविध घटकांमध्ये मैत्री व सद्भावनेचे वातावरण निर्माण झाल्यास कायद्याची गरज भासणार नाही, असे प्रतिपादन विधिज्ञ अ‍ॅड. संतोष गटकळ यांनी केले.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने ‘नागरी हक्क संरक्षण आणि अनुसूचित जाती-जमाती अधिनियम’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. रावसाहेब थोरात झालेल्या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून गटकळ बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपआयुक्त काशीनाथ गवळे, डॉ. सचिन परब, राजयोग ध्यानधारणा केंद्राच्या वासंती दिदी, सहायक आयुक्त प्राची वाजे, ‘देशदूत’चे सहायक संचालक विश्वास देवकर आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी गटकळ म्हणाले, राज्य घटनेने समानतेचे तत्त्व लागू करण्यासाठी सर्वांना सार्वजनिक स्त्रोताचा निर्भयतेने वापर करत मार्गदर्शक तत्त्वे दाखविली आहेत; मात्र समाजात परस्पर विरोधी विचारसरणीमुळे आंदोलन, मोर्चे यांसारख्या माध्यमातून कायद्यांना विरोध होतो. न्याय तत्त्वांची अंमलबजावणी करताना योग्य विचारांची गरज निर्माण होते. यासाठी घटनेने नागरी हक्क संरक्षण कायदा १९५५ साली निर्माण केला. या कायद्यावर मर्यादा आल्याने अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ लागू करण्यात आला. २०१५ साली यामध्ये काही सुधारणा झाल्या. याचा मुख्य उद्देश समाजातील विविध स्तरांमध्ये मैत्रीपूर्ण वातावरणाची निर्मिती होणे, असा आहे