पाथर्डी-वडनेर रस्त्यावर दारू पिण्याच्या कारणावरून मित्राने केली मित्राची हत्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:28 IST2017-10-16T00:28:06+5:302017-10-16T00:28:41+5:30

Friend murderd by friend on drinking water on Pathardi-Vadneर road | पाथर्डी-वडनेर रस्त्यावर दारू पिण्याच्या कारणावरून मित्राने केली मित्राची हत्त्या

पाथर्डी-वडनेर रस्त्यावर दारू पिण्याच्या कारणावरून मित्राने केली मित्राची हत्त्या

ठळक मुद्देदारू पीण्यावरून वाद

नाशिक - पाथर्डी-वडनेर रस्त्यावर दारू पिण्याच्या कारणावरून रविवारी (दि.१५) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास एकाने त्याच्याच मित्राचा खून केला. विशाल संजय बोरसे (२२, रा. चेहडी शिव) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. विशाल आणि सागर रामदास शिंदे यांच्यात रात्रीच्या सुमारास दारु पिण्यावरून वाद झाला होता. वादाचे पर्यावसन हाणामारीत झाल्यानंतर सागर याने धारदार शस्त्राने विशालवर वार केल्याने रक्तस्त्राव झाल्याने विशालचा जागीच मृत्यू झाला. सागर व विशाल हे मीत्र आहे. सहा. पोलीस आयुक्त सचीन गोरे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थ्ळी दाखल झाले. त्यांनी तपास करून संशयित सागर यास अटक केली आहे. 

Web Title: Friend murderd by friend on drinking water on Pathardi-Vadneर road