सात वर्षांच्या गुलामगिरीतून मजुरांची मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 11:49 PM2020-02-22T23:49:08+5:302020-02-23T00:23:36+5:30

वैतरणानगर : श्रमजीवीच्या वेठबिगारमुक्ती मोहिमेमुळे मागील आठवड्यात इगतपुरी तालुक्यातील दांपत्याची अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून सुटका केल्याची घटना ताजी असतानाच ...

Freeing laborers from seven years of slavery | सात वर्षांच्या गुलामगिरीतून मजुरांची मुक्तता

सात वर्षांच्या गुलामगिरीतून मजुरांची मुक्तता

Next
ठळक मुद्देवणी पोलिसात गुन्हा दाखल; श्रमजीवीने मुक्त केले द्राक्षबागेतील वेठबिगार

वैतरणानगर : श्रमजीवीच्या वेठबिगारमुक्ती मोहिमेमुळे मागील आठवड्यात इगतपुरी तालुक्यातील दांपत्याची अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून सुटका केल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी ठाणगाव (सुरगाणा) येथील मजुरांची वणी (दिंडोरी) येथील द्राक्ष बागायतदार मालकाच्या सात वर्षाच्या गुलामगिरीतुन सुटका केली आहे.
जऊळके येथील बागायतदार मालक राजेंद्र बाबूराव पाटील यांच्याकडे अत्यल्प मजुरीत वेठबिगार असलेल्या तुकाराम गावित या मजुराची पत्नी मुलांसह सुटका करत मालकावर वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे यांनी दिली. तुकाराम पांडू गावित (३३) यांच्या गावातील यशवंत नामदेव ठाकरे हा जऊळके येथे राजेंद्र बाबूराव पाटील यांच्याकडे द्राक्षबागेत कामाला होता. यशवंतच्या ओळखीने तुकारामला पाटील यांनी ५० हजार रुपये आगाऊ दिले. घराचे काम आटोपून तुकाराम दोन महिन्यानंतर जऊळके येथे राजेंद्र बाबूराव पाटील यांच्या द्राक्षबागेत कामासाठी आपले बिºहाड घेऊन दि. ६ जून २०१३ रोजी गेला. त्यानंतर त्या ठिकाणी तुकाराम आणि त्याची पत्नी दोघेही बागेत काम करू लागले. सुरुवातीला कामाचा मोबदला म्हणून २५ हजार रुपये व तीन पोते बाजरी वर्षाला देता येईल, असे सांगितले. गेले म्हणजे केवळ ६८ रुपये दिवस मजुरी आणि तुकारामाच्या पत्नीला ७० रुपये मजुरी मालक देत होता. त्या बदल्यात हे दोघे रोज सकाळी ७ वाजेपासून ते रात्री ८ वाजेपर्यंत बागेचे काम करत होते. त्यानंतर
सात वर्षात ही मजुरी वार्षिक
४५ हजारपर्यंत पोहचली.
महिन्याला अवघी १२३ रुपये मजुरी, बदल्यात अधिक काम करून घेतले गेले. याला कंटाळून त्यांनी श्रमजीवी संघटनेकडे धाव घेऊन न्याय मिळविला.

मालकाचा जाच
वणी येथील मालकाकडे जेव्हा तुकाराम हिशेब सांगत असे तेव्हा मालक तुकारामाच्या अंगावरच २० ते २५ हजार उलट शिल्लक असल्याचे सांगत होता. या जाचाला कंटाळून तुकारामने परवडत नसल्याचे सांगितले तेव्हा मालकाने तुकारामच्या अंगावरच १ लाख ५३ हजार ३०० रु पये बाकी असल्याचे सांगत ती फेड आणि मगच जा, असे सांगत त्याच्या पत्नीला बंधक बनवून राबवत ठेवले.

कार्यकर्त्यांचे प्रसंगावधान
श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या प्रसंगावधानामुळे या कुटुंबाची सुटका झाली. पुढील तपास वणी पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. या वेठबिगार मुक्तीच्या प्रकरणात श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे, मुरलीधर कनोज, राजू राऊत, हिरामण कडाळी यांनी सततचा पाठपुरावा करत कुटुंबाच्या माथी मारलेला गुलामगिरीचा डाग यशस्वीपणे पुसून काढला आहे.

असहायतेचा गैरफायदा
गरिबांच्या आर्थिक असहायतेचा गैरफायदा घेत त्यांचे श्रम विकत घेऊन त्याच्या मूलभूत हक्क आणि अधिकारांवर गदा आणण्याचा हा प्रकार सध्या ठिकठिकाणी श्रमजीवी संघटना उघड करत आहे. याच गावातील मजुरांना श्रमनजीवीने मुक्त केलेले असल्याने कार्यकर्त्यांकडे न्यायाच्या अपेक्षेने तुकारामने संपर्क केला. कार्यकर्त्यांच्या तत्परतेने आणि विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनामुळे पोलिसांनीदेखील तातडीने याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Freeing laborers from seven years of slavery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.