शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक ग्रामीण कोविड सेन्टरमध्ये पोलीस कुटुंबियांना मोफत उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 13:26 IST

ओझर : नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयाजवळ आडगाव येथे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सत्तर बेडच्या कोविड केअर सेंटरमध्ये पोलीस व ...

ओझर : नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयाजवळ आडगाव येथे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सत्तर बेडच्या कोविड केअर सेंटरमध्ये पोलीस व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मोफत कोविड उपचार दिले जात आहे.आडगाव येथील ग्रामीण पोलीस मुख्यालयासमोर पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आरोग्य सेवा सुसज्ज मिळावी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुशोभीकरण करून त्याचे कोविड सेंटरमध्ये रूपांतर करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली. त्याला जिल्हा परिषद प्रशासनाने तात्काळ मदतीचा हात पुढे केला. याच कोविड सेन्टर मुळे पोलीस दलाच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांना परिवारातील सदस्यांना उपचाराची उच्च सुविधा मोफत मिळत असल्याने कोरोनाच्या धास्तीपासून मोठ्या प्रमाणात दिलासा मिळत आहे.---------------------७० ऑक्सिजन बेडचे सुसज्ज कोविंड सेंटरया कोविड सेंटरमध्ये एकूण ७० ऑक्सिजन बेड आहेत. यात तेरा जण रुग्णांची देखभाल करण्यासाठी तैनात आहेत, त्यात तीन विशेषज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे.त्यामुळे सुसज्ज ग्रामीण पोलीस कोविड सेन्टरचा आदर्श पॅटर्न नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदाच बघायला मिळाला आहे. (२० ओझर १)------------------------ग्रामीण पोलीस दल यांनी एक कुटुंब समजून मुख्यालायजवळ कोविड सेंटर सुरू केले. याठिकाणी ग्रामीण पोलीस दल व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना मोफत उपचार मिळत असून प्राथमिक उपचारात मोठा हातभार रुग्णांना लागत आहे. सुविधा व उपचार बाबतीत विशेष लक्ष दिले जात आहे.-सचिन पाटील, पोलीस अधीक्षक, नाशिक.

टॅग्स :Nashikनाशिक