निफाडला राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसतर्फे मोफत कांदा वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 04:33 PM2018-12-24T16:33:57+5:302018-12-24T16:35:04+5:30

निफाड : कांद्याला हमीभाव मिळावा या मागणीसाठी व शिवसेना भाजपा युती शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा जाहीर निषेध म्हणून सोमवारी निफाड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जनतेस मोफत कांदा वाटप करण्यात आले .

Free Onion Allocation by Nationalist Youth Congress at Nifad | निफाडला राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसतर्फे मोफत कांदा वाटप

निफाडला राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसतर्फे मोफत कांदा वाटप

Next

निफाड : कांद्याला हमीभाव मिळावा या मागणीसाठी व शिवसेना भाजपा युती शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा जाहीर निषेध म्हणून सोमवारी निफाड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जनतेस मोफत कांदा वाटप करण्यात आले . सकाळी ११ वाजता निफाड येथील शांतीनगर त्रिफुली येथे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ,यांच्या हस्ते मोफत कांदा वाटप सुरू करण्यात आले. पाच किलो व दहा किलोच्या गोण्यांचे पॅकिंग करण्यात आले होते. या कांदा वाटपाचा सामान्य ,गरीब नागरिकांनी लाभ घेतला. निफाड पिंपळगाव बसवंत रस्त्यावरून जाणार्या वाहनचालकांनी वाहने थांबवून या कांद्याच्या गोण्या स्वीकारल्या . याप्रसंगी माजी आमदार दिलीप बनकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, राष्ट्रवादीचे युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरु षोत्तम कडलंग, सौ.भारती पवार, लासलगाव कृउबाचे संचालक राजेंद्र डोखळे, सुभाष कराड, निफाड तालुका राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र बोरगुडे, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे प्रदेश चिटणीस सागर कुंदे आदि उपस्थित होते.

Web Title: Free Onion Allocation by Nationalist Youth Congress at Nifad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक