येवल्यात गोरगरिबांना मोफत भोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 23:20 IST2020-04-05T23:19:09+5:302020-04-05T23:20:29+5:30
येवला : येथील सामाजिक कार्यकर्ते विजय खोकले यांच्या परिवाराच्या वतीने गोरगरिबांना मोफत भोजन उपक्र म राबविला जात आहे.

येवल्यात गोरगरिबांना मोफत भोजन
ठळक मुद्देमोरणी पैठणी प्रांगणात मोफत भोजन व्यवस्था
येवला : येथील सामाजिक कार्यकर्ते विजय खोकले यांच्या परिवाराच्या वतीने गोरगरिबांना मोफत भोजन उपक्र म राबविला जात आहे. कोरोना व्हायरसच्या पाशर््वभूमीवर लॉकडाउन, संचारबंदी यामुळे बाजारपेठा, सर्व उद्योग व्यवसाय बंद झालेले आहे. कोपरगाव रोडवरील मोरणी पैठणी प्रांगणात मोफत भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. लॉकडाउन संपेपर्यंत सदर मोफत भोजन व्यवस्था सुरू ठेवणार असल्याचे विजय खोकले यांनी सांगितले. सदर उपक्र म यशस्वीतेसाठी मयूर खोकले, सुनील खोकले, योगेश खोकले, अमोल चव्हाण आदी आपले योगदान देत आहेत.