नाशिक : बदलत्या शिक्षणाच्या प्रवाहातून पूर्णवेळ शिक्षणाची संकल्पना कालबाह्य होणार असून, मुक्त शिक्षण हीच शाश्वत शिक्षणपद्धती अस्तित्वात राहणार आहे. पारंपरिक शिक्षण व्यवस्थेत पदवीपर्यंत पोहचणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याने अशा विद्यार्थ्यांना मुक्त शिक्षणाचा प्रवाहात आणण्यासाठी मुक्त शिक्षणाचे सक्षम धोरण तितकेच महत्त्वाचे ठरणार असल्याचे प्रतिपादन अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या २४व्या दीक्षान्त समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर, कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, परीक्षा नियंत्रक डॉ. अर्जुन घाटुळे, व्यवस्थापन मंडळ सदस्य, विद्वत परिषदेचे सदस्य व नियोजन मंडळाचे सदस्य उपस्थित होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन होते. यावेळी सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांना पदवी, तर १४ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. प्रारंभी यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी चांदेकर म्हणाले, औपचारिक विद्यापीठातून शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांपेक्षा मुक्त विद्यापीठातून पदवीेघेणारा विद्यार्थी नैतिकदृष्ट्या मोठा ठरतो. केवळ शिक्ष णपूर्ण करण्यासाठी विद्यार्थी विद्यापीठात दाखल होतो आणि शिक्षणपूर्ण करतो यातून त्याच्या शिक्षणाची गरज लक्षात येते. पारंपरिक विद्या पीठात मात्र सुमारे ७७ टक्क्के विद्यार्थी हे शिक्षणापासून दूर जात असल्याचे चित्र आहे. यातीलच काही मुले पुढे मुक्त शिक्षणाकडे वळत असल्यामुळे मुक्त शिक्षणाची कल्पना प्रभावी ठरते. त्यामुळेच बदलत्या शिक्षणव्यवस्थेत मुक्त शिक्षणाची व्यापकतादेखील साचेबद्ध कर ण्याची गरज असल्याचे चांदेकर म्हणाले. दूर शिक्षणामध्ये शिकण्यावर भर आहे, तर पारंपरिक शिक्षणामध्ये शिकविण्यावर भर आहे. या पद्धतीत विद्यार्थी शिकतोच हे सांगता येत नाही. परंतु दूरशिक्षणामध्ये विद्यार्थी शिक्षणासाठीच दाखल होतो ही मुक्त शिक्षणाची ताकत असल्याचे ते म्हणाले, आर्थिक व सामाजिक रचनेची व्यवस्था म्हणून मुक्त शिक्षणाकडे पाहण्याची गरज असल्याचेही चांदेकर म्हणाले.गेल्या दोन दशकांत दूरशिक्षण पद्धतीत नोंदणीचा दर १० टक्यांनी वाढला आहे. १९६२ मध्ये दूरशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण देणारी एकमेव संस्था होती. आज ही संख्या १००च्या वर गेली आहे.१४ विद्यार्थ्यांना सुवर्णपदकया समारंभात १४ विद्यार्थ्यांना १५ सुवर्णपदके देऊन गौरविण्यात आले. त्यात काजल ठाकूर (बी.ए.), स्वाती राहाटे (बी.लिब), वसुंधरा इगवे (वृत्तपत्रविद्या), मोनाली राळेकर (एमबीए), अफीरीन कवचाली (एम.कॉम.), वर्षा माळी (बी.कॉम.), स्मिता ढाकणे (बी.एड.), प्रियांका विसे (बी.एस्सी. अॅग्रीकल्चर/ हॉर्टिकल्चर), प्रकाश कामटे (बी.सी.ए.), कोमल जुनेजा (बी.एस्सी. - एच.एस.सी.एस), तौशीफ सामनानी (बी.एस्सी. एचटीएम), बीना शर्मा (बी.आर्च), शिखर सिंग (बी.टेक- मरीन इंजिनिअरिंग), वैष्णवी चाळके (बी.एस्सी. एमएलटी) यांचा ामावेश आहे.आॅनलाइन प्रमाणपत्र प्रणालीचे उद्घाटनउत्तीर्ण विद्यार्थ्यांना आपले प्रमाणपत्र आॅनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले. या तांत्रिक सेवेचे लोकार्पण प्रा. राम ताकवले यांच्या हस्ते करण्यात आले. या पदवीदान सोहळ्यात पदविका १५ हजार ६३२ पदविका तसेच ४३ विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिके देऊन गौरविण्यात आले आहे.
मुक्तशिक्षणच राहणार शाश्वत : मुरलीधर चांदेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:27 IST