पिंपळगाव ग्रामपालिकेतर्फे मोफत ई-बाइक; कार चार्जिंग पॉइंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 17:23 IST2021-02-06T17:22:32+5:302021-02-06T17:23:10+5:30
पिंपळगाव बसवंत : शहरातील पर्यावरण संतुलित राहावे यासाठी पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून व माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहरातील सार्वजनिक ठिकाणी इंधनविरहित ई-बाइक व ई-कार वाहनांसाठी मोफत चार्जिंग पॉइंट सेंटर उभारण्यात आले आहे.

पिंपळगाव ग्रामपालिकेतर्फे मोफत ई-बाइक; कार चार्जिंग पॉइंट
पिंपळगाव बसवंत : शहरातील पर्यावरण संतुलित राहावे यासाठी पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून व माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहरातील सार्वजनिक ठिकाणी इंधनविरहित ई-बाइक व ई-कार वाहनांसाठी मोफत चार्जिंग पॉइंट सेंटर उभारण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील पहिले असे गाव आहे की, ज्याठिकाणी वाहनांची मोफत चार्जिंग सुविधा ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिली आहे. पिंपळगाव ग्रामपालिकेने ह्यमाझी वसुंधराह्ण योजनेंतर्गत शहरात विविध अभिनव उपक्रम राबविण्यास प्रारंभ केला आहे.
शहरातील हवा संतुलित राहावी व वाहनांद्वारे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी ग्रामपालिकेने इंधनविरहित बॅटरीचा ई-बाइक व ई-कार यासाठी मोफत चार्जिंग पॉइंट सेंटर खुले केल्याने वाहनधारकांचादेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.
निसर्ग वाचवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ग्रामपंचायतच्या पुढाकाराने नागरिकांच्या गरजा ओळखून व निसर्ग समतोल राहावा यासाठी ई-बाइक ई-कार चार्जिंग पाइंट सेंटर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
-गणेश बनकर, ग्रामपंचायत सदस्य
माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहरात ई-बाइक व ई-कारसाठी उभारलेले मोफत चार्जिंग पॉइंट सेंटर. (०६ पिंपळगाव २)