दामदुप्पटच्या आमिषापोटी लाखोंची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:19 IST2019-05-11T00:18:15+5:302019-05-11T00:19:14+5:30
गुंतविलेल्या पैशांवर दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात माउली मल्टिस्टेट को. आॅप. क्रेडिट सोसायटीसह संकल्प सिद्धी प्रॉडक्टर इंडिया प्रा. लि.च्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दामदुप्पटच्या आमिषापोटी लाखोंची फसवणूक
नाशिक : गुंतविलेल्या पैशांवर दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात माउली मल्टिस्टेट को. आॅप. क्रेडिट सोसायटीसह संकल्प सिद्धी प्रॉडक्टर इंडिया प्रा. लि.च्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप भीमराव पाटील (३७, रा. त्रिमूर्ती चौक) यांनी संशयित विष्णू रामचंद्र भागवत, रमण खंडू बिºहाडे यांच्यासह माउली मल्टिस्टेट व संकल्प सिद्धी या कंपनीच्या संचालकांनी गंडविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
संशयितांनी ठेवीदारांना पैसे गुंतविल्यानंतर वेगवेगळी आमिषे दाखविली. त्यामुळे ठेवीदारांनी लाखो रुपयांची गुंतवणूक कंपनीत केली; मात्र ठेवीदारांच्या रकमेचा संशयित संचालकांनी संगनमताने अपहार करून लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. पाटील यांनीदेखील ३ लाख २० हजार रुपयांची गुंतवणूक कंपनीकडे केली होती. तर उर्वरित तक्र ारदारांनीही लाखो रु पयांची गुंतवणूक केली आहे.
फसवणुकीचा हा आकडा कोट्यवधींच्या घरात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.